Maratha Reservation : 'बाळा, नेत्याच्या नादाला लागू नको'; मुलाला भावनिक पत्र लिहित वडिलांनी संपवलं जीवन

Manoj Jarange : सरकार आरक्षण देत नाही, बाळा कोणत्याही नेत्याच्या नादाला लागू नको; मुलाला उपदेश करत वडिलांनी जीवन संपवलं, या घटनेमुळे मराठवाड्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Sopan Auti
Sopan AutiSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील सहा महिन्यापासून आंदोलन करत आहे. त्यांच्या नाकातून रक्त आले तरी सरकारने आरक्षण दिले नाही. बाळा यापुढे कोणत्याही नेत्याच्या नादाला लागू नको, अशी चिठ्ठी लिहित पैठण तालुक्यातील एका तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. (Marathi News)

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाहीये. राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरू केली. मात्र ओबीसीतून सगेसोयऱ्यासह मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतांनाच अंतरवाली सराटी येथील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sopan Auti
Girish Mahajan On Jarange : 'मनोज जरांगेंना आता माफी नाही' ; फडणवीसांवरील टीका महाजनांच्या जिव्हारी!

अशातच पैठण तालुक्यातील आपेगांव येथील तरुणाने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आत्महत्या केली. त्याच्याजवळ एक सुसाईड नोट सापडली असून ज्यात आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असून, 'माझ्या मुलाने नेत्यांच्या नादी लागू नये' असा उल्लेख आहे. सोपान भागवतराव औटे (वय 40 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आपेगाव येथील सोपान भागवतराव औटे यांनी गट क्र.316 मधील शेतातील लिंबाच्या झाडाला सोमवारी सकाळी 8 वाजता गळफास घेतला. पैठण (paithan) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. पंचनाम्यादरम्यान पोलिसांना एक चिठ्ठी सापडली.

त्यात 'माझ्या मृत्यूशी वैयक्तिक कोणाचा काही एक संबंध नाही. मराठा योद्धा मनोजदादा जरांगे (Manoj Jarange) यांच्या नाकातून रक्त आले, तरीही सरकार आरक्षण देत नाही. या सरकारचा निषेध म्हणून मी आत्महत्या करीत आहे' असा उल्लेख आढळला. माझा मुलगा आदी संतांच्या, देवाच्या नादी लाग. बाळा कोणत्याच नेत्याच्या नादी लागू नको, असे सोपान यांनी आपल्या मुलाला उद्देशून पत्रात लिहिले आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Sopan Auti
PM Modi Visit Yavatmal : मोदींच्या सभेसाठी महिलांना जबरदस्तीने बसमध्ये बसवून नेले; नाना पटोलेंचा गंभीर आरोप !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com