Ambadas Danve : शेतीचा शिमगा झालायं, कृषीमंत्री कुठे आहेत ? अंबादास दानवेंचा सरकारला सवाल

Ambads Danve Criticise Agriculture Minister : राज्यातील साधारण 4500 गावे आणि लाखो हेक्टरची शेती अक्षरशः पाण्यात गेली. हे अगदी कालचे धारशिवच्या वाशीतील चित्र. पण सरकारला अजून जाग आलेली नाही.
Ambads Danve Criticise Agriculture Minister News
Ambads Danve Criticise Agriculture Minister NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेती पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

  2. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या अनुपस्थितीवरून अंबादास दानवे यांनी संतप्त सवाल उपस्थित केला.

  3. शिवसेनेने सरकारवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तीव्र टीका केली आहे.

Shivsena UBT News : दसरा तोंडावर आलायं, पण अतिवृष्टी, ढगफुटीने शेतीचा अक्षरशः शिमगा झाला आहे. अशावेळी राज्याचे कृषीमंत्री कुठे आहेत? असा सवाल शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला. मराठवाडा मुक्तीसंग्रमा दिनाच्या ध्वजारोहणाला आलेल्या 'देवा'ने साक्षात येऊन मदतीचे चाॅकलेट दिले, पण मदत मिळेल तर खरे? असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठवाड्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. कुठे ढगफुटी तर कुठे अतिवृष्टीने शेती, जनावरे, पीकं, घरं वाहून गेली. जमीनी खरडून निघाल्याने तर काही ठिकाणी पीक,शेत अन् जमीनही गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु राज्याचे कृषीमंत्री कुठेही फिरताना दिसत नाहीयेत. सरकारच्या या बेफीकरीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी तिखट शब्दात हल्ला चढवला.

दसऱ्याच्या तोंडावर शेतीचा शिमगा होऊन बसला असताना राज्याचे कृषीमंत्री आहेत कुठे आहेत? राज्यातील साधारण 4500 गावे आणि लाखो हेक्टरची शेती (Farm) अक्षरशः पाण्यात गेली. हे अगदी कालचे धारशिवच्या वाशीतील चित्र. पण सरकारला अजून जाग आलेली नाही. मुक्तीसंग्राम दिनी 'लवकरात लवकर'मदत करण्याचे चॉकलेट साक्षात 'देवा'कडून मिळाले. पण मदत मिळेल तेव्हा खरं.

Ambads Danve Criticise Agriculture Minister News
Ambadas Danve : मराठवाडा पुरात, 'देवा' जरा इकडे बघ! अंबादास दानवेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला

शेतकऱ्यांचे धैर्य खचू नये म्हणून तातडीने मदत होणे आवश्यक आहे, हे सरकारला समजायला हवे. नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करू, असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला.शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि आधार हवा असताना सरकार केवळ पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवत असल्याचेही दानवे म्हणाले.

Ambads Danve Criticise Agriculture Minister News
शेतीचे शंभर टक्के नूकसान; जिल्ह्याला विशेष पॅकेज देण्याची पालकमंत्री मुंडेची मागणी..

मोदी है तो मुमकीन है..

ज्या देशात 'शिक्षक द्या' म्हणून विद्यार्थ्यांना 65 किलोमीटर पायी चालून आपली मागणी ठेवावी लागत असेल, भविष्यात त्या देशात केवळ अकुशल कामगारांची संख्या वाढीस लागेल. 2047 पर्यंत विकसित भारतचे स्वप्न केवळ जीडीपीच्या आधारावर पाहण्यात काही शहाणपण नाही. शिक्षक असतील तर विद्यार्थी घडतील, हा साधा नियम आहे. अरुणाचालमध्ये शिक्षक मागण्यासाठी रात्रभर 65 किलोमीटर पायी चालणाऱ्या त्या बहाद्दर 90 विद्यार्थिनींच्या धैर्याला सॅल्युट आहे.

पण त्यांना शिक्षक मिळालेच नाहीत. उलट शाळेतील दोघांचे निलंबन मात्र झाले, या घटनेकडे दानवे यांनी लक्ष वेधले. ही घटना पाहता, पूर्वांचलसाठी दिल्ली आणि त्यांच्या आपल्या राजधान्याही अजून 'दूर'आहेत, हेच यातून अधोरेखित होते! महाराष्ट्रात 'आमची शाळा चालू राहू द्या',अशी मागणी घेऊन विद्यार्थी चालले तर आश्चर्य वाटायला नको, शेवटी 'मोदी है तो मुमकीन है', असा टोला अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारला लगावला.

FAQs

प्र.1: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे काय नुकसान झाले?
उ.1: मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडले आहेत.

प्र.2: अंबादास दानवे यांनी कोणावर सवाल केला?
उ.2: कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या अनुपस्थितीवर त्यांनी सवाल केला.

प्र.3: शिवसेनेची या प्रकरणात काय भूमिका आहे?
उ.3: शिवसेनेने सरकारवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

प्र.4: शेतकरी कोणती मागणी करत आहेत?
उ.4: शेतकरी तातडीच्या मदतीची आणि भरपाईची मागणी करत आहेत.

प्र.5: ही घटना कुठे घडली?
उ.5: मराठवाडा विभागात अतिवृष्टीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com