Marathwada Graduate Constituency : महाविकास आघाडीमध्येही बंडाची ठिणगी? ठाकरेंच्या उमेदवाराविरुद्ध शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार!

NCP Sharad Pawar faction’s Pratapsinh Patil file nominations: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप घुगे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मविआसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
 Pratapsinh Patil file nominations
Pratapsinh Patil file nominationsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahavikas Aghadi News : शिक्षक व पदवीधर विधानपरिषदेसाठी महायुतीमध्ये उमेदवारीवरुन बंडाची ठिणगी पडलेली दिसून येत आहे. यातच आता महाविकास आघाडीलाही याची लागण झाल्याचे चित्र मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पहायला मिळत आहे. महायुतीचे सतीश चव्हाण यांच्याविरोधात भाजपाचे एम.के.देशमुख यांनी दंड थोपटले आहेत.

तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांना महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवीदा काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डाॅ. प्रतापसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

माजी मंत्री राजेश टोपे, फौजिया खान या नेत्यांच्या उपस्थितीत कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी हा अर्ज दाखल केला. त्यामुळे ठाकरेंच्या दिलीप घुगे यांना सुरूवातीलाच अपशकून होते की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी आता मनधरणी करावी लागणार आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. मविआकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील हेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

 Pratapsinh Patil file nominations
Local body elections : महत्वाची बातमी : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर?

डॉ. पाटील यांनी दुपारी एक वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्याचा दावा केला जात आहे. महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षाचे उमेदवारच आमने सामने आल्याने याचा थेट फायदा महायुतीला होऊ शकतो. या निमित्ताने आघाडीतील बेबनाव पुन्हा समोर आला आहे.

शक्तिप्रदर्शन नाही, गाजावाजा नाही, फक्त पदवीधर, युवक, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार, असे म्हणत पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला. हा केवळ उमेदवारी अर्ज नसून, मराठवाड्यातील पदवीधर, युवक, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याच्या भूमिकेची सुरुवात आहे.

 Pratapsinh Patil file nominations
Nuclear Project : ‘अणुऊर्जा’ला नागरिकांचा विरोध; मग कोकणात प्रदूषणकारी उद्योग नकोच, तटकरेंची दापोली प्रकल्पावर स्पष्ट भूमिका

पदवीधरांच्या प्रश्नांपासून युवकांच्या रोजगारापर्यंत, विद्यार्थ्यांच्या भवितव्यापासून शिक्षकांच्या प्रश्नांपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या अडचणींपासून सर्वसामान्यांच्या प्रश्नांपर्यंत प्रत्येक विषयावर सातत्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

माजी आमदार चंद्रकांत दानवे, संजय वाघचौरे, पृथ्वीराज साठे, जगन्नाथ काळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रीय युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, पदवीधर निवडणूक प्रमुख नरेंद्र काळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com