Marathwada Graduate Constituency Election: ‘माझा विजय पक्का, गुलाल घेऊनच आलोय!’; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा दावा

Maharashtra Graduate Election 2026 Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान दिलीप घुले यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत ‘गुलाल घेऊनच आलोय’ असं म्हटलं.
Maharashtra Graduate Election 2026 Result
Maharashtra Graduate Election 2026 ResultSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahavikas Aghadi-Mahayuti: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. महायुतीचे सतीश चव्हाण, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना या दोन घटक पक्षाचे अनुक्रमे डाॅ. प्रतापसिंह पाटील, दिलीप घुले अशी तिरंगी लढत झाली.

आज प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावर तीनही पक्षाचे हे उमेदवार दाखल झाले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुले यांनी आपला विजय निश्चित असल्याचा दावा करतानाच मी गुलाल घेऊनच आलो, असा विश्वास व्यक्त केला.

प्रस्थापितांच्या विरोधात आमचा हा लढा होता. परीक्षा दिली आहे, आज रिझल्टचा दिवस आहे, मेरीटमध्ये रिझल्ट लागणार. ही लढाई सामान्याची होती, प्रस्थापितांच्या विरोधात सामान्यांनी आम्हाला केलेले सहकार्य हे अनमोल आहे. निकालानंतर हे तुम्हाला दिसून येईल. समोरच्या उमेदवाराची तयारी किती होती, हे मला माहित नाही, पण आम्ही जोरदार तयारी केली होती. मेहनत, परिश्रम केले, आमच्याकडे परिश्रमाशिवाय दुसरं काहीच नव्हतं.

Maharashtra Graduate Election 2026 Result
Mahendra Thorve: ‘मला जीवे मारण्याची सुपारी दिली’; तटकरेंवर थोरवेंचा गंभीर आरोप, महायुतीत खळबळ! मदत केली नसती तर त्यांचा मुलगा आमदार झालाच नसता...

आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली. एकदा उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यानंतर आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागतात. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो. विश्वासाने, जोमाने आमचे जिल्हाप्रमुख, समन्वयक, पदाधिकारी, कार्यकर्ते मराठवाड्यात कामाला लागले होते. आघाडीतील दुसऱ्या उमेदवारामुळे परिणाम झाला तसा फायदाही होईल. आता ते निकालानंतरच स्पष्ट होईल. माझा विजय निश्चित आहे, मी सोबत गुलालच घेऊन आलो आहे, असा विश्वास दिलीप घुले यांनी व्यक्त केला.

Maharashtra Graduate Election 2026 Result
Rajasthan Panchayat Election: सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स, निवडणुकीत मिळाली फक्त 33 मतं, इन्फ्लुएन्सरला गावात मोठा धक्का

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे दिसून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दिलीप घुले यांना पक्षाने आधीच उमेदवारी जाहीर केली होती. या दोघांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत वाढल्याचे चित्र आहे. तर दिलीप घुले यांची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या रणनितीचा भाग असल्याची देखील चर्चा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com