Rajasthan Panchayat Election: सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स, निवडणुकीत मिळाली फक्त 33 मतं, इन्फ्लुएन्सरला गावात मोठा धक्का

Rajasthan Sarpanch Election Om Prakash Bishnoi: राजस्थानमध्ये निवडणुकीत सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स असलेल्या ओम प्रकाश बिश्नोईला सरपंचपदासाठी केवळ 33 मतं मिळाली.
Rajasthan Sarpanch Election Om Prakash Bishnoi
Rajasthan Sarpanch Election Om Prakash BishnoiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Rajasthan Election Results 2026: सोशल मीडियावर लाखो लोकांपर्यंत पोहोचणं आणि प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांचा विश्वास संपादन करणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. याचीच प्रचिती राजस्थानमधील ग्रामपंचायत निवडणुकीत आली आहे.

सोशल मीडियावर तब्बल 21 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या एका इन्फ्लुएन्सरला सरपंचपदाच्या निवडणुकीत अवघ्या 33 मतांवर समाधान मानावं लागलं. या निकालामुळे सोशल मीडियावरील लोकप्रियता प्रत्यक्ष राजकारणात कितपत उपयोगी पडते, यावर चर्चा सुरू झाली आहे.

राजस्थानमधील पंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओम प्रकाश बिश्नोई याच्या कामगिरीची विशेष चर्चा होत आहे. जोधपूर जिल्ह्यातील ओसिया तालुक्यातील इंदो गटातील ढाणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी त्याने निवडणूक लढवली होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानात त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या निवडणुकीत त्याला केवळ 33 मतं मिळाली.

सोशल मीडियावर लाखोंचा चाहता वर्ग

ओम प्रकाश बिश्नोई याची सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे 14 लाख फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर त्याला 2.32 लाख लोक फॉलो करतात. याशिवाय, त्याच्या यूट्यूब चॅनेलवर पाच लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असल्याची माहिती आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एवढा मोठा प्रेक्षकवर्ग असतानाही गावातील निवडणुकीत त्याला मोजकीच मतं मिळाली.

Rajasthan Sarpanch Election Om Prakash Bishnoi
Ration Card Update: तुमचे रेशन कार्ड सुरू आहे की बंद? मोबाईलवर घरबसल्या काही मिनिटांत तपासा!

सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्याच्या पोस्टना हजारो किंवा लाखो लोकांचा प्रतिसादही मिळतो. मात्र, हा प्रतिसाद प्रत्यक्ष मतदानात रूपांतरित होईलच, असं नाही. बिश्नोई याच्या निवडणूक निकालातून ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Rajasthan Sarpanch Election Om Prakash Bishnoi
DA Hike 2026: महागाई भत्ता वाढला; किती पगार वाढणार? महाराष्ट्रात DA थकबाकीसाठी 800 कोटी मंजूर

नशामुक्तीचा मुद्दाही ठरला नाही प्रभावी

माध्यमांमधील वृत्तानुसार, ओम प्रकाश बिश्नोई याने निवडणुकीत नशामुक्तीचा मुद्दा पुढे केला होता. मात्र, या मुद्द्याच्या आधारे त्याला मतदारांचा पुरेसा पाठिंबा मिळवता आला नाही. गावपातळीवरील निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्नांची जाण, नागरिकांशी असलेला थेट संपर्क, सामाजिक समीकरणं आणि वैयक्तिक विश्वास यांना महत्त्व असतं. त्यामुळे केवळ ऑनलाइन लोकप्रियतेच्या जोरावर मतदारांची पसंती मिळवणं आव्हानात्मक ठरू शकतं.

Rajasthan Sarpanch Election Om Prakash Bishnoi
PM-VBRY Yojana: पहिली नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार देणार 15 हजार रुपये; कोणाला मिळणार लाभ? दुसऱ्या हप्त्यासाठी ‘हे’ काम करा

राजस्थानातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर

राजस्थानमध्ये पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झाले आहेत. या टप्प्यात राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 3,314 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात आली.

ओम प्रकाश बिश्नोई याच्या निकालामुळे डिजिटल लोकप्रियता आणि ग्रामीण राजकारणातील प्रत्यक्ष जनाधार यांमधील फरक पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर लाखो लोकांपर्यंत पोहोचता येत असलं, तरी गावाचा कारभार सांभाळण्यासाठी मतदारांचा विश्वास जिंकणं किती महत्त्वाचं आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट झालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com