Marathwadad Graduate Constituency Election : कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलता, तुम्हाला मत का द्यायचे? महायुतीच्या मातब्बर उमेदवाराला जाब विचारणाऱ्या चिठ्ठ्या मतपेटीत!

Graduate constituency polls, Marathwada election results, Satish Chavan : मतपत्रिकेंसोबत पत्र, चिठ्ठ्या सापडल्यानंतर मोजणी करणारे कर्मचारी त्या चिठ्ठ्या व पत्र वरिष्ठांकडे जमा करत होते. पदवीधरांनी मांडलेल्या व्यथांची चर्चा मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधे होती.
Graduate Constituency Election; Satish Chavan
Graduate Constituency Election; Satish ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahayuti news : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाकडे महायुतीची हमखास निवडून येणारी जागा म्हणून पाहिले गेले. तीन टर्म आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांचा पदवीधर मतदारांशी असलेला थेट संपर्क, शैक्षणिक संस्थांचे जाळे, निवडणूक यंत्रणा हाताळण्याचा दांडगा अनुभव आणि कसब पाहता त्यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली.

भाजपाने या जागेवर दावा सांगितला होता. माजी आमदार संजय केनेकर, एम.के.देशमुख यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तसा आग्रही धरला. एम. के. देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्जही भरला. पण महायुतीचा धर्म पाळायचा असे स्पष्ट आदेश वरून आले आणि देशमुखांनी माघार घेतली.

महायुतीकडून सतीश चव्हाण यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मित्र पक्षांसह सगळेच कामाला लागले. सतीश चव्हाण यांची बाजू भक्कम वाटत असताना प्रचारादरम्यान विरोधकांनी आणि पदवीधरांनी त्यांना अठरा वर्षात काय केले? हा सवाल विचारत भंडावून सोडले होते.

Graduate Constituency Election; Satish Chavan
MLC Election Result : काँग्रेसला मोठा धक्का; विद्यमान आमदाराचा पराभव, पाचवेळा निवडून गेले होते विधानपरिषदेत

चव्हाण यांनी आपल्या परीने त्याला उत्तरही दिले. पण पदवीधरांनी अठरा वर्षात काय केले? यासह २०२४ मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्याचा जाब थेट मतपेटीत चिठ्ठ्या टाकून विचारल्याचा प्रकार आज मतमोजणी दरम्यान समोर आला.

मतमोजणीदरम्यान मतपेटीतून अनेक गंमतीदार,उमेदवारांना अप्रत्यक्षरित्या जाब विचारणाऱ्या चिठ्ठ्या आढळल्या. कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष बदलणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. तीन-तीन टर्म तुम्हाला सत्तेत पाठविले तरी तुम्ही आमच्यासाठी काही केले नाही. आमचा आवाज होण्याचा प्रयत्न देखील तुम्ही केला नाही, असा मजकूर असलेल्या चिठट्या मतपत्रिकेत सापडल्या.

Graduate Constituency Election; Satish Chavan
Baramati News : शरद पवारांनी पहिल्या निवडणुकीपासूनचा बारामतीतील निष्ठावान सोबती गमावला!

काही मतपत्रिकेमध्ये तर शासकीय विभागातील विविध समस्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांच्याही समस्यांकडे पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार वारंवार मागणी करूनही लक्ष देत नसल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला होता.

मतपत्रिकेंसोबत पत्र, चिठ्ठ्या सापडल्यानंतर मोजणी करणारे कर्मचारी त्या चिठ्ठ्या व पत्र वरिष्ठांकडे जमा करत होते. पदवीधरांनी मांडलेल्या व्यथांची चर्चा मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधे होती. हे संदेश वाचून मतमोजणी अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी आश्चर्यचकित झाले.

काही चिठ्ठ्यांमधील मजकुराची मतमोजणी केंद्रावर चर्चाही रंगली. मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच जाहीर करण्यात येत होते. परंतू, बाहेर अमुक उमेदवार इतक्या हजारांनी लीडवर, तमुक उमेदवार पराभवाच्या छायेत अशा अफवांना उधाण आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com