Sanjay kenekar : विधानपरिषदेची निवडणूक जाहीर होताच हालचालींना वेग; भाजपचा माजी आमदार CM फडणवीसांच्या भेटीला : राष्ट्रवादीकडून जागा खेचून घेणार?

Sanjay Kenekar’s activities draw attention, while BJP and NCP discuss their claims: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय केणेकरांच्या हालचाली चर्चेत आल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीतील जागावाटपाचा पेच तसेच सतीश चव्हाणांच्या तयारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Sanjay Kenekar’s activities draw attention
Sanjay Kenekar’s activities draw attentionSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच मराठवाड्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत असताना भाजपनेही या मतदारसंघावर दावा मजबूत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच भाजपचे महामंत्री तथा माजी आमदार संजय केणेकर यांच्या राजकीय भेटींमुळे महायुतीच्या गोटातच ‘पदवीधर’च्या जागेवरून रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने संजय केणेकर यांनी मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. या भेटीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यामुळे वर्षा भेट धार्मिक की राजकीय याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपने यापूर्वीच मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची जबाबदारी संजय केणेकर यांच्याकडे सोपवली होती. त्यामुळे पक्षाने केणेकर यांच्यावर टाकलेली जबाबदारी ही केवळ संघटनात्मक आहे की त्यामागे उमेदवारीचा मोठा राजकीय संदेश आहे, याकडे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये या जागेसाठी अनेक इच्छुक असले तरी केणेकर यांचे नाव चर्चेत आहे.

महायुतीतच पदवीधरचा पेच?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांच्याकडे आहे. 2020 मध्ये चव्हाण यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला होता. मात्र आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भाजप हे महायुतीतील घटक पक्ष आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना महायुतीची उमेदवारी मिळणार की भाजप स्वतःचा उमेदवार देणार? हा कळीचा प्रश्न बनला आहे.

सध्याच्या राजकीय चर्चेत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये या जागेवरून रस्सीखेच असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे केणेकरांकडे इच्छुक उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. भाजपने मतदार नोंदणीपासूनच या मतदारसंघात संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या जागेवर कुठला उमेदवार दिला जाणार याची उत्सुकता मतदार संघात आहे.

Sanjay Kenekar’s activities draw attention
MLC Election : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मित्रपक्षांची एकमेकांविरोधातच 'फिल्डिंग'; महायुती अन् मविआच्या गोटात प्रचंड अस्वस्थता; कोण मारणार बाजी?

फडणवीस-केणेकर भेटीने चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केणेकरांची भेट झाल्यानंतर पदवीधर मतदारसंघाबाबतच्या चर्चांना आणखी धार आली आहे. या भेटीत नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी पदवीधर मतदारसंघासाठी केणेकर आग्रही असल्याने केनेकर यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. केणेकर हे भाजपच्या संघटनात्मक राजकारणातील सक्रिय नेते असून मराठवाड्यात पक्ष विस्ताराच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका राहिली आहे. त्यामुळे ‘मतदार नोंदणीची जबाबदारी’ ते ‘उमेदवारीची मागणी’ असा राजकीय प्रवास सुरू झाला आहे का? असा सवाल आता भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांपासून राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

Sanjay Kenekar’s activities draw attention
BJP News : जिल्हाध्यक्षाची खुर्ची अन् आमदारकीची संधी; मराठवाड्यात सात जणांना लागली लॉटरी...

चव्हाणांसमोर भाजपचे कमळ?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी सुमारे २.९ लाख मतदारांची नोंदणी झाल्याचे माहिती समोर येत आहे. भाजपकडून या जागेसाठी तयारी वाढत असताना राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महायुतीतील दोन घटक पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकणार का? हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरत आहे.

जर भाजपने स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, तर केणेकरांचे नाव कितपत पुढे येते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. दुसरीकडे महायुतीने जागावाटपाचा फॉर्म्युला कायम ठेवला आणि राष्ट्रवादीला ही जागा दिली, तर भाजपच्या इच्छुकांची पुढील भूमिका काय राहणार, हाही प्रश्न आहे.

मविआतही हालचालींना वेग

महायुतीत जागावाटपावरून चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीतही या मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवार आणि निवडणुकीच्या रणनीतीबाबत हालचाली सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे

आता खरी उत्सुकता महायुतीच्या निर्णयाकडे लागली आहे. भाजप जागेसाठी आक्रमक दावा करणार की राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराला साथ देणार याकडे लक्ष असणार आहे. महायुतीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर मित्रपक्षच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसांत मिळणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com