Karnataka MLC Election Results : विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचा सुफडा साफ! चारही जागा NDA कडे, कर्नाटकात शिवकुमार सरकार हलले

Karnataka MLC Election Results 2026 latest news : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे धक्के बसले असून महाराष्ट्रात अद्याप निकाल हाती आलेला नाही. पण तीन ठिकाणी महायुती आघाडीवर असून कर्नाटकात काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.
Karnataka MLC Election Results
Karnataka MLC Election ResultsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Karnataka BJP JD(S) alliance wins all four Karnataka MLC seats: राज्यासह कर्नाटकात विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, तर कर्नाटकात एनडीए विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत रंगली आहे. महाराष्ट्रातील पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू असून, निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, एनडीएने चारही जागांवर विजय मिळवत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे.

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली आहे. दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निकालाकडे विशेष लक्ष लागले आहे. मतमोजणीदरम्यान तीन जागांवर महायुती, तर दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

विद्यमान काँग्रेस आमदार जयवंत आसगावकर यांना शिक्षक मतदारसंघात धक्का बसला आहे. त्यामुळे काँग्रेसची ही जागा जाण्याची शक्यता असून, येथे भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या दोन जागांपैकी एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयाच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या जागेवर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे.

Karnataka MLC Election Results
Maharashtra Politics Live Updates MLC Election Results 2026 : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण, गावडेंना 5227 मतांची आघाडी

कर्नाटकात एनडीएचा चारही जागांवर विजय

कर्नाटक विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजप-जेडीएसच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) चारही जागांवर विजय मिळवला. या निकालामुळे सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, पक्षाला एकाही जागेवर यश मिळवता आले नाही.

बंगळूर शिक्षक मतदारसंघात एनडीएचे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांनी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य पुट्टण्णा यांचा पराभव केला. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीत पुट्टण्णा यांनी आघाडी घेतली होती. मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये रंगनाथ यांनी मुसंडी मारली आणि अखेर सुमारे ९०८ मतांच्या फरकाने विजय मिळवला. पुट्टण्णा यांनी यापूर्वी शिक्षक मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ईशान्य शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार शशिल जी. नमोशी यांनी विजय मिळवला. त्यांना पहिल्या फेरीत ७,२३९, तर दुसऱ्या फेरीत ७,३११ मते मिळाली. अशा प्रकारे त्यांना एकूण १४,५५० मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार शरणप्पा मत्तूर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

पश्चिम पदवीधर मतदारसंघात भाजपचे एस. व्ही. संकनूर यांनी काँग्रेसचे मोहन लिंबिकाई यांच्यावर निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. पहिल्या फेरीत संकनूर यांना सुमारे ६,४८३, तर लिंबिकाई यांना ४,२७७ मते मिळाली होती. त्यामुळे संकनूर यांनी २,२०६ मतांची आघाडी घेतली होती.

दक्षिण-पूर्व पदवीधर मतदारसंघातही भाजपचे उमेदवार के. एम. सुरेश यांनी आघाडी कायम ठेवत विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार शशी हुलिकुंटेमठ यांना पराभव पत्करावा लागला. या चारही मतदारसंघांतील निकालामुळे भाजप-जेडीएस आघाडीला विधान परिषद निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे.

Karnataka MLC Election Results
Maharashtra MLC Election Results: विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसवर नामुष्की : अधिकृत उमेदवाराला 0 मतं, स्वतःची शेकडो मतं तिसऱ्याच उमेदवाराला देण्याची वेळ

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील मतदारांचा कौल काँग्रेसच्या विरोधात गेल्याचे या निकालातून दिसून येत आहे. पश्चिम पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी धारवाड येथील कृषी विद्यापीठाच्या परिसरात झाली. ईशान्य शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी गुलबर्गा येथे, तर बंगळूर शिक्षक आणि दक्षिण-पूर्व पदवीधर मतदारसंघांची मतमोजणी बंगळूर येथे पार पडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com