Jintur Assembly Constituency : मतदारसंघात विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, आता पुन्हा संधी द्या!

Meghna Bordikar says, made sincere efforts for development work, now give another chance : कोविड काळामध्ये सामान्य जनतेला मी स्वतः तिथे जाऊन मदत केलेली आहे. जिंतूर-सेलू मतदारसंघ महाराष्ट्रात विकासकामाबाबत एक नंबरवर आणणार असल्याचे, आश्वासन मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
Mla Meghna Bordikar News
Mla Meghna Bordikar NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत मतदारसंघामध्ये जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकासकामे केली. सेलू-जिंतूर तालुक्यात काही विकासकामे सुरू आहेत. दर्जाही उत्कृष्ट ठेवण्यात येत आहे. दोन्ही तालुक्यातील उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यासाठी मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन महायुतीच्या जिंतूर विधासभेच्या आमदार व उमेदवार मेघना बोर्डीकर यांनी मतदारांना केले.

रवळगाव (ता. सेलू) शिवारातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. तो पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी पडला. (Meghna Bordikar) परंतु, पुढील संधी मिळाली तर नक्कीच तो प्राधान्याने पूर्ण करेल. कोविड काळामध्ये सामान्य जनतेला मी स्वतः तिथे जाऊन मदत केलेली आहे. जिंतूर-सेलू मतदारसंघ महाराष्ट्रात विकासकामाबाबत एक नंबरवर आणणार असल्याचे, आश्वासन मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

Mla Meghna Bordikar News
Mahayuti And MVA : विधानसभा निवडणुकीत 'आश्वासनांची स्पर्धा'; पण आर्थिक स्थितीचे काय?

जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत केलेल्या विविध विकासकामांच्या बळावर आमदार मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. (BJP) यामुळेच त्यांना प्रचारा दरम्यान प्रतिसाद मिळत आहे. मतदार त्यांच्या बाजूने कौल देऊन विधानसभेत पुन्हा संधी देतील, असा विश्वास डॉ. संजय रोडगे यांनी स्नेहमेळावा कार्यक्रमात व्यक्त केला.

Mla Meghna Bordikar News
BJP Manifesto : शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांसाठी दरमहा 2100 रुपये, भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाच्या घोषणा!

यावेळी ॲड. दत्तराव कदम, प्रकाशबाप्पा गजमल, दीपक रोडगे, संजय गटकळ, बद्री ताठे, उद्धव खेडेकर, विष्णू महाराज पुरी, दत्तराव लाटे, उत्तम गजमल, विश्वनाथ गजमल, अशोक चाळके, गणेश काटकर, रामप्रसाद रोडगे, शिवाजी रोडगे, विलास रोडगे, सुनील रोडगे, प्रदीप रोडगे, बाळासाहेब लोंढे, दत्तराव ताठे, रमेशराव गायकवाड, दत्तराव गाते, रामा घोडके, बद्री बरसाले, गणेश सोळंके उपस्थित होते.

Mla Meghna Bordikar News
Mahayuti Politics : महायुतीतील शिंदे अन् अजितदादांचे उमेदवार एकमेकांविरोधात भिडणार

रवळगाव व जिल्हा परिषद गटातील गोहेगाव, डासाळा, मालेटाकळी, शिंदेटाकळी, लाडनांद्रा, कुपटा, देवला पुनर्वसन, घोडके पिंपरी, डिग्रस बरसाले, डिग्रस वाडी आदी गावातील नागरिक, तसेच डॉ. संजय रोडगे मित्रमंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com