Suresh Warpudkar News : मेघना बोर्डीकर-सुरेश वरपूडकरांच्या एकत्रित ताकदीने परभणीत भाजप भक्कम!

BJP to Gain Strength in Parbhani with Bordikar and Varpudkar : विशेष म्हणजे वरपुडकरांनी भाजपप्रवेशासाठी कोणत्याही अटी-शर्ती न घातल्याचे नमूद करत, पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी स्वीकारेन, असे म्हटले आहे.
Meghna Bordikar-Suresh Warpudkar News Parbhani
Meghna Bordikar-Suresh Warpudkar News ParbhaniSarkarnama
Published on
Updated on

गणेश पांडे

Parbhani Politics : जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा निर्णय घेत काँग्रेसचे माजी मंत्री व विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी अखेर कॉग्रेसला रामराम ठोकला आहे. ते मंगळवारी (ता.29) औपचारिकरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून, त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामागे फक्त कार्यकर्त्यांचा आग्रहच आहे का, की राजकीय सत्ता टिकवण्यासाठीचा डाव, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सुरेश वरपुडकरांनी (Suresh Warpudkar) त्यांच्या भाजप प्रवेशामागचे नेमके कारण स्पष्ट न करताना, कार्यकर्त्यांचा वाढता दबाव आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना, आमच्या कार्यकर्त्यांना प्रशासनाकडून अडवले जात होते. त्यांची कामे खोळंबत होती, या कुचंबनेला आळा घालण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे त्यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

विशेष म्हणजे वरपुडकरांनी भाजपप्रवेशासाठी कोणत्याही अटी-शर्ती न घातल्याचे नमूद करत, पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी स्वीकारेन, असे म्हटले आहे. तथापि, त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामागे फक्त कार्यकर्त्यांचा आग्रहच आहे का, की राजकीय सत्ता टिकवण्यासाठीचा डाव, हे लवकरच स्पष्ट होईल. विशेषतः महापालिका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील वर्चस्व कायम राखण्यासाठी वरपुडकरांनी भाजपचा (BJP) हात धरल्याची कुजबुज आहे.

Meghna Bordikar-Suresh Warpudkar News Parbhani
Suresh Warpudkar News : काँग्रेसचा आणखी एक माजी मंत्री भाजपाच्या गळाला! सुरेश वरपूडकर हाती कमळ घेणार

वरपुडकरांच्या या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यात काँग्रेसच्या गोटात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता त्यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये सत्ता समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरपुडकरांचा भाजपप्रवेश हा निव्वळ कार्यकर्त्यांच्या हितासाठी आहे की राजकीय भविष्याचा हिशोब, याचे उत्तर येत्या काळात स्पष्ट होईल.

Meghna Bordikar-Suresh Warpudkar News Parbhani
Meghna Bordikar-Vijay Bhamble News : मंत्री मेघना बोर्डीकरांविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी फास आवळणार!

एकाच म्यानात दोन तलवारी ?

परभणी जिल्ह्याचे राजकारण हे दीर्घकाळ वरपुडकर व बोर्डीकर या दोन मात्तबर नेत्यांभोवती फिरत आले आहे. आता हे दोघेही भाजपच्या छत्राखाली एकत्र येणार असल्याने, दोन धारदार तलवारी एकाच म्यानात टिकणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बोर्डीकर यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश करून मुलगी मेघना बोर्डीकर यांना मंत्रीपद मिळवून दिले. आता वरपुडकरांचा भाजपप्रवेश निश्चित झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार आहे.

Meghna Bordikar-Suresh Warpudkar News Parbhani
Shaktipeeth highway survey Parbhani : 'शक्तीपीठ'साठी आले, पोटभर जेवण करून गेले; परभणीत मोजणी अधिकाऱ्यांसोबत नेमकं काय घडलं?

दोघांचीही स्वतंत्र राजकीय ओळख, मजबूत गट आणि रणनीतीतली पकड लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्था व इतर संस्थांतील सत्तासंघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील भाजपचा अंतर्गत समन्वय आणि भविष्यातील सत्तावाटप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com