MHT-CET Controversy : भाजप नगरसेवकांच्या जुळ्या मुलांना MHT-CET मध्ये 99 पर्सेंटाइल; बारावीच्या गुणांचा दाखला देत परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा काँग्रेसचा आरोप

Nanded MHT-CET 2026 controversy : भाजप नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना MHT-CET परीक्षेत अनुक्रमे 99 पर्सेंटाइल मिळाले आहेत. त्यावरून या परीक्षेच्या निकालात गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांनी केली आहे.
Nanded  MHT-CET 2026 Result Controversy
Nanded MHT-CET 2026 Result ControversySarkarnama
Published on
Updated on

Nanded MHT-CET Controversy : MHT-CET 2026 परीक्षेच्या निकालावरून नांदेडमध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. काँग्रेसने परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांनी आरोप केला की, आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना MHT-CET परीक्षेत अनुक्रमे 99 पर्सेंटाइल मिळाले आहेत.

मात्र बारावीच्या PCM गटात त्यांना अनुक्रमे 56 टक्के आणि 51 टक्के गुण मिळाले होते. तसेच JEE परीक्षेत त्यांना अनुक्रमे 51 आणि 28 पर्सेंटाइल मिळाले होते. त्यामुळे बारावी आणि JEE च्या निकालाच्या तुलनेत MHT-CET मध्ये इतके उच्च गुण कसे मिळाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झाला आहे का, याची वस्तुनिष्ठ तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

Nanded  MHT-CET 2026 Result Controversy
Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात 15 शाळांचा संचालक असलेला भाजपचा मोठा मासा जाळ्यात; सोलापुरातून घेतले ताब्यात

दरम्यान, भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक आशिष नेरळकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा दावा केला आहे. नेरळकर सांगितले की, त्यांच्या दोन्ही मुलांचे सुरुवातीपासूनच लक्ष्य MHT-CET परीक्षा होते आणि त्यांनी त्यासाठी विशेष तयारी केली होती. बारावीच्या परीक्षेपेक्षा CET च्या अभ्यासावर अधिक भर दिल्यामुळे बारावीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले.

"बारावीतील गुण आणि MHT-CET मधील गुणांचा थेट संबंध नसतो. माझ्या मुलांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिली आहे. कोणताही पेपर फुटलेला नाही किंवा कोणताही गैरप्रकार झालेला नाही. हवी ती चौकशी करा, आम्हाला त्याची कोणतीही भीती नाही," असे नेरळकर यांनी म्हटले.

Nanded  MHT-CET 2026 Result Controversy
Free school transport : शालेय विद्यार्थ्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय; मोफत वाहतूक अन् ६ हजारांची मदत

तसेच, या आरोपांमुळे त्यांच्या दोन्ही मुलांवर मानसिक तणाव निर्माण झाल्याचे सांगत, राजकीय हेतूने त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणामुळे नांदेडमध्ये राजकीय वातावरण तापले असून, चौकशीच्या मागणीमुळे MHT-CET निकालाबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com