Imtiaz Jaleel News : एमआयएमकडून 'वंचित'ला पर्याय आझाद समाज पक्ष! इम्तियाज जलील यांच्या घरी झाली बैठक

AIMIM initiates talks for an alliance with Bhim Army's Chandrashekhar Azad. The first meeting was held at Imtiyaz Jaleel's residence : विशेषतः तरुणांमध्ये रावण यांची क्रेज असल्याचा फायदा एमआयएमला शहरी भागात होऊ शकतो, असा तर्क लावला जात आहे. एमआयएमची ताकद शहरातील मुस्लिम बहुल भागातील 20-25 वार्डांमध्ये आहे.
Imtiaz Jaleel- Chandrashekar Azhad Party Meeting News
Imtiaz Jaleel- Chandrashekar Azhad Party Meeting NewsSarkarnama
Published on
Updated on

Aimi News : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने एमआयएम पक्षाकडून युतीसाठी चाचपणी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने युती तोडल्यानंतर याचा फटका एमआयएमला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसला. ज्या वंचित आघाडीच्या मदतीने इम्तियाज जलील 2019 मध्ये खासदार म्हणून निवडून गेले होते, त्यांचा 2024 मध्ये पराभव झाला. तर विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यासह छत्रपती संभाजीनगरच्या मध्य मतदारसंघातील एमआयएमचा उमेदवार पराभूत झाला.

एमआयएमची (Aimim) मुस्लिम वोट बँक मजबूत असली तरी एकट्याच्या बळावर विजय मिळवणे सोपे नाही, याचा अंदाज पक्षाच्या नेत्यांना चांगलाच आला आहे. वंचितने आघाडी तोडल्यानंतर दुरावलेल्या दलित मतांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न म्हणून इम्तियाज जलील यांनी भीम आर्मीचे अध्यक्ष खासदार चंद्रशेखर यांच्या आझाद समाज पक्षासोबत युतीची तयारी चालवली आहे. भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद रावण यांची लोकप्रियता गेल्या काही दिवसात वाढली आहे.

विशेषतः तरुणांमध्ये रावण यांची क्रेज असल्याचा फायदा एमआयएमला शहरी भागात होऊ शकतो, असा तर्क लावला जात आहे. (Imtiaz Jaleel) एमआयएमची ताकद शहरातील मुस्लिम बहुल भागातील 20-25 वार्डांमध्ये आहे. काही प्रमाणात वंचित घटकांची मते पक्षाकडे खेचता आली तर आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएम किंगमेकरच्या भूमिकेत दिसू शकतो. एमआयएमला एकाच वेळी दोन्ही शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस-राष्ट्रवादी अशा पक्षांशी दोन हात करावे लागणार आहेत.

Imtiaz Jaleel- Chandrashekar Azhad Party Meeting News
Imtiaz Jaleel On Thackeray : देर आये दुरुस्त आये! ठाकरे बंधुंना एकत्र येण्यावाचून पर्याय नव्हता..

मुस्लिम मतांमते फूट न पडू देता वंचित घटकांची मते मिळवून महापालिकेतील सत्तेचे गणित इम्तियाज जलील हे जुळवू पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण यांच्या पक्षासोबर युती करण्याच्या संदर्भात एमआयएमने चर्चा सुरू केली आहे. आजाद समाज पक्ष महाराष्ट्र प्रभारी गौरी प्रसाद उपास यांच्यासोबत इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती आहे. आंबेडकरी विचारांची आणि मुस्लिम मतांची बांधणी करण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे.

Imtiaz Jaleel- Chandrashekar Azhad Party Meeting News
Imtiaz Jaleel On Thackrays : इम्तियाज जलील म्हणतात, भाजपाला संपवायचे असेल तर राज-उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे!

रोष कमी करण्याचा प्रयत्न..

इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गेल्या महिन्यात बेकायदा कुटुंबाच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप केला होता. वर्ग दोन ची जमीन पत्नी, दोन मुलांच्या नावे खरेदी केल्याचे पुरावे, खरेदी खत माध्यमांना दाखवताना 'हरिजन' असा उल्लेख इम्तियाज यांनी केला होता. त्यानंतर आंबेडकरी समाजामध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. शहरातून मोर्चा काढत इम्तियाज यांच्या अटकेची मागणीही करण्यात आली होती. हा रोष कमी करण्याचा प्रयत्नही या नव्या पर्यायाच्या माध्यमातून इम्तियाज यांनी सुरू केल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com