Walmik Karad MCOCA : संतोष देशमुख हत्येच्या कटात वाल्मिक कराडभोवती फास घट्ट; उद्या पुन्हा न्यायालयात...

Minister Dhananjay Munde Walmik Karad court MCOCA CID Beed Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराड याला 'सीआयडी'ने वर्ग करून घेतलं असून, त्याला 'मकोका' लावण्यात आला आहे.
Walmik Karad MCOCA 1
Walmik Karad MCOCA 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत, मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला सीआयडीने वर्ग करून घेतले. याशिवाय त्याला 'मकोका' अंतर्गत कारवाईत घेतलं आहे.

वाल्मिक कराड याला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या गुन्ह्याच्या तपासासाठी उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. यासाठी कोठडीच्या मागणीची तयारी करण्यात आली आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्याभोवती कायद्याचा फास पोलिसांनी अधिकच घट्ट करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, मयत संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

वाल्मिक कराड हा खंडणीच्या गु्न्ह्यात पुणे 'सीआयडी' (CID) कार्यालयात 31 डिसेंबरला सरेंडर झाला. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली. पोलिसांनी त्याच्या मालमत्तेच्या तपासासाठी राज्यात, देशात आणि परदेशात शोध घेण्यासाठी पुन्हा पोलिस कोठडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने ते मुद्दे नाकारले. यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Walmik Karad MCOCA 1
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडला 'मोक्का', काही क्षणात परळीची बाजारपेठ बंद; टायर जाळले, समर्थक टाॅवरवर अन्...

कायद्याचा फास अधिक घट्ट

वाल्मिक कराड याला लगेचच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात वर्ग करून घेण्यात आले. याशिवाय त्याच्याविरोधात 'मकोका' देखील लावण्यात आला. पोलिसांनी (Police) या हत्येतील पूर्वीच्या आठ आरोपींविरोधात 'मकोका' लावला आहे. त्यावेळी वाल्मिक कराड याला वगळण्यात आलं होते. आता कराड याला 'मकोका'त वर्ग करून घेण्यात आलं आहे. त्यामुळे कराड याच्याभोवती कायद्याच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.

Walmik Karad MCOCA 1
Sharad Pawar On Amit Shah : 'तडीपार झालेली अन् नोंद घ्यावी, अशी ती व्यक्ती नाही'; शरद पवारांनी अमित शाहांच्या वर्मी घाव घातला

'सीआयडी'चा तांत्रिक पुराव्यांवर भर

संतोष देशमुख हत्येच्या कटाच्या गुन्ह्यात त्याला उद्या बीडमधील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. 'सीआयडी'ने त्याच्या कोठडीच्या मागणीची तयारी केली आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्या आहेत. 'सीआयडी'ने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात तांत्रिक पुरावे जुळवत आहेत. यातच वाल्मिक कराडकडे तपास करायचा आहे. त्यामुळे सीआयडी कोर्टात काय युक्तिवाद करते याकडे लक्ष असणार आहे.

न्यायासाठी लढत राहणार

दरम्यान, मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड याला हत्येच्या कटाच्या गुन्ह्यात आणि मकोकात घेतल्यानं त्यावर प्रतिक्रिया दिली. धनंजय देशमुख म्हणाले, "या हत्याकांडात जे आरोपी आहेत, त्या सर्वांना 'मकोका'मध्ये घेण्यात यावं. मुख्यमंत्र्यांनी कुणालाही सोडणार नाही, आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. आम्ही न्याय मागत आहोत आणि कायम न्यायाच्याच भूमिकेतच राहू. पोलिसांचा तपास योग्य दिशेनं चाललेला दिसतो. एका लोकप्रतिनिधीची हत्या घडली आहे, ती कोणी घडवून आणली? कशा पद्धतीने झाली? यात कोण कोण सहभागी आहे? या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे".

धनंजय देशमुखांनी तपासाची माहिती मागितली

वाल्मिक कराड याला हत्येच्या कटात आणि मकोकामध्ये घेताच, त्याचे समर्थकांना परळी बंद केली. टायर जाळले, बस फोडल्या, काही समर्थकांनी अंगावर ज्वलनशील तेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. यावर धनंजय देशमुख यांना बोलण्यास नकार देत, मी न्यायासाठी लढत राहणार असल्याचे सांगितले. धनंजय देशमुख यांनी एसआएटी प्रमुख आयपीएस बसवराज तेली यांची भेट घेत, हत्या प्रकरणातील तपासामधील माहितीबाबत पञ दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com