Sanjay Bansode News : निधीवाटपावरून महायुतीमध्ये मतभेद; मंत्री संजय बनसोडेंच्या विरोधात शिवसैनिकांची खदखद

Latur Political News : मंत्री संजय बनसोडे निधी वाटपामध्ये फक्त त्यांच्या मतदारसंघातील गावांचा विचार करीत असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांनी व्यक्त केली .
Gopal Mane, Sanjay Bansode
Gopal Mane, Sanjay Bansode Sarkarnama
Published on
Updated on

प्रशांत शेटे

Latur News : विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने सध्या महायुतीमधील घटक पक्षात मतभेद असल्याचे पहावयास मिळते. विशेषतः क्रीडामंत्री असलेले संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी निधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

निधी वाटप करीत असताना फक्त त्यांच्या मतदारसंघातील गावांचा विचार मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) करीत असल्यामुळे इतर गावांवर अन्याय होत असल्याची भावना काही जणांनी व्यक्त केली आहे. (Sanjay Bansode News)

महायुतीच्या सरकारमध्ये लातूर जिल्ह्याचे नेतृत्व करीत असलेले मंत्री असलेले संजय बनसोडे यांच्याकडून शिवसैनिकांना सापत्न वागणुक मिळत असल्याची तक्रार शिवसैनिकांनी वरिष्ठांकडे केली आहे. निधी वाटपामध्ये फक्त त्यांच्या मतदारसंघातील गावांचा विचार करीत असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना शिवसेनेचे (Shivsena) ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख माने यांनी संजय बनसोडे यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत. राज्यामध्ये शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता स्थापन होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. संजय बनसोडे यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळाले याचा सर्व शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला होता.

Gopal Mane, Sanjay Bansode
Beed Assembly Election : बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या हायप्रोफाइल लढती ठरणार लक्षवेधी

बनसोडे हे कोट्यवधी रुपयाचा निधी जिल्ह्याध्ये आणत आहेत. परंतु हा निधी फक्त त्यांच्याच एका मतदारसंघात वापरला जात आहे. जिल्ह्यातील इतर गावात विकास कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन योजना राबविल्या जात असताना जिल्ह्यातील शिवसैनिकांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जात नाही.

सन्मानाची वागणूक देण्याची विनंती

महत्वाच्या बैठकांना शिवसैनिकांना बोलविले जात नाही. जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालूकाप्रमुख, शहरप्रमुख हे महायुतीचा धर्म पाळून काम करीत आहेत. मात्र मंत्री बनसोडे यांच्याकडून शिवसैनिकांना विश्वासात घेतले जात नाही, विधानसभा निवडणूक काही दिवसावर आल्या असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी सन्मानाची वागणूक देण्याची विनंती जिल्हाप्रमुख माने यांनी केली आहे.

Gopal Mane, Sanjay Bansode
Jayant Patil News : वस्तादाने एक डाव शिल्लक ठेवला होता; मुश्रीफांच्या बालेकिल्यामध्ये जाऊन जयंत पाटलांचा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com