दिलीप दखणे
Jalna News : मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर आमचा विश्वास आहे.याआधी त्यांनी समाजाची कामे मार्गी लावली आहेत, त्यामुळेच आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. एक महिन्याच्या मुदतीत देसाई आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगे सोयरे, हैद्राबाद गॅजेटचा प्रश्न निकाली काढतील, असा विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
विधीमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षण,आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे व इतर विषयावर विरोधकांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नाला शंभुराज देसाई यांनी सविस्तर उत्तर दिले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे प्रतिक्रिया देतांना आपला शंभुराज देसाई यांच्यावर विश्वास असल्याचे म्हटले आहे.मराठा समाजाला दिलेले आश्वासन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व सरकार पूर्ण करतील याबद्दल मला विश्वास आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात 5 लाखापेक्षा कमी नुकसान झालेल्या प्रकरणातील गुन्हे मागे घेता येऊ शकतात. मात्र त्यापेक्षा अधिक झालेले नुकसानीचे गुन्हे मागे घेता येणार नाही, असे शंभुराज देसाई यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले होते. यावर जरांगे पाटील म्हणाले, पोलिसांनी नाहक अनेकांना गुंतवले आहे, सीसीटीव्ही फुटेज चेक करून गुन्ह्यात नसणाऱ्या लोकांना बाहेर काढा.
गोरगरीब मराठा समाजाला ञास देणे बंद करणे गरजेचे आहे. सरकारने 13 जुलैपर्यंत मराठा (Maratha) समाजाला आरक्षण नाही दिले तर समाजाची बैठक घेऊन 288 पाडायचे का उमेदवार उभे करायचे? हे जाहीर करण्यात येईल. अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे वास्तव्यास असलेल्या व आंदोलनाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे रेकी होत असल्याचा प्रकार समोर आला होता.
तीन वेळा ड्रोन कॅमेराद्वारे रेकी केली. ड्रोनच्या घिरट्याचा तपास करण्यासाठी नेमलेल्या पोलिस पथकाने आज जरांगे पाटील यांची भेट घेतली.जरांगे पाटील यांनी ही ड्रोनच्या माध्यमातून पुन्हा रेकी केली असल्याचे पथकाला सांगितले. अधिवेशनातही या मुद्यावर चर्चा झाली, मात्र ड्रोनच्या घिरट्या थांबल्या नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
तसेच या संदर्भात गावकऱ्यांनी पोलिसात (Police) तक्रार दाखल केली असून पोलीस प्रशासनाने पथक नेमल्यानंतरही ड्रोनच्या घिरट्या कमी झालेल्या नाहीत.ड्रोनच्या घिरट्या घालण्याचा नेमका उद्देश काय समजले नाही.वाईट कामासाठी होतो,चांगल्या कामासाठी वापरले जाते आणि त्यांचा नेमका हेतू काय आहे? हे ड्रोन कोणाचे, प्रशासनाचे की अन्य कोणाचे?ते रात्रीच्या वेळेतच का उडवले जातात हे समजले पाहिजे,असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.