Video Manoj Jarange Patil : सराटीमधील आंदोलनस्थळ अन् निवासस्थानाची मध्यरात्री ड्रोनद्वारे वॉच? जरांगे म्हणाले, मराठ्यांशी...

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास सरकारला 13 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. यातच दोन-तीन दिवसांपासून ड्रोनद्वारे वॉच ठेवला जात असल्याचं समोर आलं आहे.
manoj jarange patil
manoj jarange patilsarkarnama
Published on
Updated on

मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी शिंदे सरकारला 13 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी आणि ओबीसीतून आरक्षण घेण्यावर जरांगे-पाटील ठाम आहेत. या मागणीविरोधात ओबीसी नेतेही एकवटले आहेत.

यातच जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्या आंदोलनस्थळासह राहत असलेल्या निवासस्थानावर ड्रोनवरून पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन-तीन दिवसांपासून टेहाळणी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.

जालन्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी आणि मनोज जरांगे-पाटील मुक्कामी असलेल्या सरपंचांच्या निवासस्थानावर ड्रोननं टेहाळणी केली जात आहे. तीन दिवसांपूर्वीच असाच प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. अंतरवाली सराटीच्या सरपंचांनी ही माहिती पोलिसांना ( Police ) कळवली आहे. याप्रकरणी तक्रार देणार माहिती सरपंचांनी दिली आहे.

manoj jarange patil
Manoj Jarange Patil : पंकजा मुंडेना उमेदवारी, जरांगे पाटील म्हणाले, 'स्वागत करणारा मी कोण ?'

ड्रोन टेहाळणी करत असल्याचं स्वत:हा जरांगे-पाटलांनी पाहिलं आहे. जरांगे-पाटील म्हणाले, "ड्रोन पाठविणाऱ्याला विधानपरिषदेवर पाठवावं लागेल. मराठ्यांशी खोटे चाळे करून जमणार नाही. ड्रोन पाठवा किंवा काहीही पाठवा आम्ही भीत नसतो."

manoj jarange patil
Maratha Reservation News : मनोज जरांगेंचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार, अख्खा मराठवाडा पिंजून काढणार..

"निष्ठेने रोखू शकत नसल्यानं ड्रोन पाठवून छपरी चाळे करण्यात येत आहे. ड्रोन लावा नाहीतर काहीही लावा आरक्षण घेणार आणि तेही ओबीसीतूनच ( Obc Reservation )," अशी प्रतिक्रिया जरांगे-पाटलांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com