मुंबई : राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध स्तरावर भूखंड वाटपाला स्थगिती देण्यात आली होती. (Shivsena) ही स्थगिती त्वरित उठवण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून केली आहे.
वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून (Aurangabad) गुजरातला गेल्यानंतर उद्योगांसाठीच्या जमिनीबाबत पुनर्वलोकन केलं जात असल्याचा मुद्दा समोर आला होता. (Eknath Shinde) त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी २० सप्टेंबर रोजी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भूखंड वाटपास दिलेली स्थगिती उठविण्यात आली असल्याचे म्हटले.
मात्र आज २२ दिवस उलटूनही भूखंड स्थगिती बाबतचा निर्णय जैसे थे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देत दानवे यांनी भूखंड स्थगितीबाबतचे आदेश निर्गमित न झाल्याने भूखंडाच्या निर्णयाबाबतची कार्यवाही ठप्प झाल्याचे निदर्शनास आणून दिले.
स्थगिती उठविण्याबाबतच्या निर्णयाचे आदेश निर्गमित न केल्याने वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पा प्रमाणे इतर प्रकल्पही अन्य राज्यात जाण्याची शक्यता अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
राज्यातील उद्योगाला चालना मिळावी व राज्यात गुंतवणूक येऊन रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावर जातीने लक्ष घालून स्थगित उठवण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करावी, असेही दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.