Parbhani Political News : अजित पवार गटात गेले, तरीही आमदार बाबाजानींची साडेसाती संपेना...

Marathwada News : दुर्राणी यांनी हृदयात शरद पवार यांना ठेवून शरीराने अजित पवार यांच्याशी हातमिळवणी केली.
Parbhani Political News
Parbhani Political NewsSarkarnama
Published on
Updated on

NCP Political News : निधी मिळत नाही, कामे होत नाही म्हणत राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) विधान परिषदेतील आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी नुकताच अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. (Marathwada Politics News) आता तरी आपल्या मागचे शुक्लकाष्ठ संपेल या विचाराने दुर्राणी यांनी सुटकेचा निःश्वास सोडला; पण अजित पवारांसोबत जाऊनही दुर्राणी यांनी साडेसाती काही संपेना असेच म्हणावे लागेल.

Parbhani Political News
Dharashiv Loksabha Constituency : धाराशिवची जागा शिवसेनेची, पण भाजप म्हणते आमची तयारी पूर्ण; महायुतीत ठिणगी...

भाजप पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर बाबाजानी (Babajani Durani) यांच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीच्या अवैध कामावर हातोडा पडणार आहे. त्यामुळे सत्तेत दादागिरी करणाऱ्या (Ajit Pawar) अजित पवारांकडूनही दुर्राणींना मदत मिळत नसल्याने ते हैराण झाल्याचे चित्र आहे. राजकारणात नेहमीसाठी कोणीही शत्रू किंवा मित्र नसतो असे नेहमीच सांगितले जाते; परंतु परिस्थिती बदलल्याने शत्रू बनलेले सर्वच एकाचवेळी हल्ला करत असतील, तर ते त्रासदायकच असते. असाच काहीसा अनुभव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांना येत आहे.

शहरातील भाजप नेते उद्धव नाईक यांनी दिलेल्या तक्रारीमुळे दुर्राणी यांच्या ताब्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अवैध ठरवण्यात आलेले बांधकाम तत्काळ पाडण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी दिले आहेत. (NCP) अगोदरच शिंदे गटाचे सईद खान यांनी आव्हान उभे केल्यानंतर आता भाजप नेत्यांच्या तक्रारीने बाबाजानी यांना हैराण करून सोडले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील पंचवीस वर्षांपासून पाथरीनगर परिषदेवर एकहाती सत्ता राखलेल्या बाबाजानी दुर्राणी यांच्या ताब्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने एका ठरावाद्वारे कापूस खरेदीसाठी बाजार समितीच्या आवारातील मोकळी जागा ३२ व्यापाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांनी या ठिकाणी टीनशेडचे बांधकाम उभारले. मात्र, या जागेचे बेकायदेशीर वाटप होऊन मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजपच्या ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उद्धव नाईक यांनी जिल्हा उपनिबंधक, परभणी यांच्याकडे केली.

या प्रकरणाची त्रिस्तरीय समिती मार्फत चौकशी होऊन समितीने अहवाल सादर केला. या अहवालानुसार बाजार समितीच्या जागेवरील टीनशेडचे बांधकाम तत्काळ पाडण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर दुर्राणी यांनी शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवली. मात्र, त्यांच्या ताब्यातील पाथरीनगर परिषदेला निधी मिळण्यात होणाऱ्या अडचणी व शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला.

Parbhani Political News
Marathwada Shivsena News : ठाकरे गटाची 'होऊ दे चर्चा', शिंदेंच्या सेनेची चर्चाच नाही...

महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट असल्याने राजकीय प्रतिकूलता कमी होईल, या आशेने दुर्राणी यांनी हृदयात शरद पवार यांना ठेवून शरीराने अजित पवार यांच्याशी हातमिळवणी केली. मात्र, तरीही दुर्राणी यांचा त्रास अजूनही कमी झालेला नाही. मागील पंचवीस वर्षांपासून ताब्यात असलेली पाथरीनगर परिषद, बाजार समिती, पंचायत समितीवर सत्ता, जिल्हा परिषद गट व तालुक्यातील बहुतांश गावातील सरपंच दुर्राणी यांच्या मर्जीतलेच असायचे.

त्यामुळे आजपर्यंत पाथरी तालुक्यात त्यांच्या विरोधात जाऊन सत्ता हस्तगत करण्यात विरोधक अपयशी ठरले होते. मात्र, शिवसेना शिंदे गटातील सईद खान यांनी मोठ्या प्रमाणात निधी मिळवला आणि दुर्राणी यांच्या समर्थकांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिला. बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच बाबाजानी यांचे विरोधक सदस्य म्हणून निवडून आले. यामुळे आता भाजपच्या नेत्यांना पाठबळ मिळाले असून, त्यांच्या प्रयत्नांना मोठी ताकद मिळत आहे. एकूणच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार यांच्यासोबत जाऊनही दुर्राणी यांना महायुतीतील घटक पक्षाकडून विरोधाचा सामना करावा लागत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com