MLA Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या मोर्चाला संभाजीनगरात परवानगी नाही, कोण आडवतो ते पाहतो म्हणत दिले आव्हान...

MLA Bachhu Kadu will take out a march in Sambhajinagar : आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. या तयारीचा भाग म्हणूनच त्यांच्याकडून शेतकरी, कामगार, मंजूर, कष्टकरी, दिव्यांगांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी मोर्चे काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : शेतकरी, कष्टकरी, मजुर, दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढू पाहणाऱ्या प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 9 आॅगस्ट रोजी हा मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे कळताच बच्चू कडू संतप्त झाले असून `आम्हाला कोण आडवतो तेच पाहतो` म्हणत त्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे.

परवानगी नसली तरी मोर्चा काढण्यावर बच्चू कडू ठाम असून त्यांनी लाखोच्या संख्येने शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि कार्यकर्त्यांना संभाजीनगरात येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शुक्रवारी संभाजीनगरात काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. (Chhatrapati Sambhajinagar) राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरून यात्रा, रॅली काढल्या जात आहेत. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे.

आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. या तयारीचा भाग म्हणूनच त्यांच्याकडून शेतकरी, कामगार, मंजूर, कष्टकरी, दिव्यांगांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी मोर्चे काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरात 9 आॅगस्ट रोजी मोर्चा काढत शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत असलेल्या बच्चू कडू यांना पोलिसांनी परवानगी नाकारत दणका दिला.

Bacchu Kadu
Bacchu Kadu : भावी मुख्यमंत्र्याच्या यादीत आता बच्चू कडूंची भर; सोलापुरात झळकले बॅनर

नेमकी परवानगी कोणत्या कारणामुळे नाकारली हे अद्याप स्पष्ट नसले तरी यामुळे बच्चू कडू चांगलेच संतापले आहेत. पोलिसांनी परवानगी दिली नाही, तरी आपण मोर्चा काढणारच, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. महायुती-महाविकास आघाडीच्या विरोधात राज्यात तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Bachhu Kadu) बच्चू कडू संभाजीनगरातील मोर्चात या संदर्भात महत्वाची घोषणा करणार असल्याचे समजते.

परंतु पोलिसांनी आता मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे बच्चू कडू काय निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. देशात आर्थिक विषमतेचा प्रश्न मोठा आहे. कष्ट करणाऱ्याला त्यांच्या घामाचे दाम मिळत नाही, पण मध्ये दलाली करणारा लाखो कमावतो ही वस्तुस्थिती आहे. पण यावर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचे आहे की दलालांचे असा प्रस्न पडतो? असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

Bacchu Kadu
Bacchu Kadu Advice To Govt : बच्चू कडूंचा सरकारला अजब सल्ला; ‘पैसे नसतील तर गव्हर्नरचा 40 एकरांवरील बंगला विका’

सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर कडू यांनी टीका केली. काबाड कष्ट करणाऱ्याला पैसे दिले पाहिजेत. त्यांच्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर त्यांनी चाळीस एकरवर असलेला राज्यपालांचा बंगला विकावा, त्यातून लाखभर कोटी रुपये येतील, असा टोला सरकारला लगावला. भव्य मोर्चा काढून आम्ही आमची ताकद दाखवू आणि अंतिम निर्णय घेऊ, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com