Bacchu Kadu : भावी मुख्यमंत्र्याच्या यादीत आता बच्चू कडूंची भर; सोलापुरात झळकले बॅनर

Future Chief Minister : यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स लागले आहेत. त्यात आता बच्चू कडू यांची भर पडली आहे.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 July : सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले प्रहार संघटनेचे प्रमुख तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून शहरात फ्लेक्स झळकले.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स लागले आहेत. त्यात आता बच्चू कडू यांची भर पडली आहे.

आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे आज (ता. 29 जुलै) उदगीर, लातूरच्या दौऱ्यावर आहेत. लातूरला जाताना आमदार बच्चू कडू हे सोलापुरात (Solapur) आले होते. सोलापुरात बच्चू कडू यांच्या स्वागताला प्रहार संघटनेकडून प्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यात सोलापुरातील सात रस्ता परिसरात बच्चू कडू यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून प्लेक्स लागले आहेत. त्याची चर्चा सोलापुरात आहे.

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी सात रस्ता परिसरात प्लेक्स लावले आहेत. सात रस्ता परिसरात बच्चू कडू यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागले आहेत. आमदार कडू यांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाष्य केले.

Bacchu Kadu
Angar Upper Thasil Office : राजन पाटील समर्थकांच्या बैठकीत गोंधळ; ‘अनगरला अप्पर तहसील नेण्याचं कारण काय,’ महिलेने विचारला जाब

यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले यांचे वेगवेगळ्या शहरात भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी बीडच्या दौऱ्यावर आलेले जयंत पाटील यांचेही बीड शहरात भावी मुख्यमंत्री असे प्लेक्स लावून स्वागत करण्यात आले आहे, त्यामुळे ‘भावी मुख्यमंत्री’पदाचे राज्यात सर्वत्र पीक जोमात असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंचेही असे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते.

Bacchu Kadu
Bacchu Kadu Advice To Govt : बच्चू कडूंचा सरकारला अजब सल्ला; ‘पैसे नसतील तर गव्हर्नरचा 40 एकरांवरील बंगला विका’

‘योजना कोणासाठी हेही पाहा’

आमचे 16 मुद्दे आहेत, ते जर मान्य होतं असतील तर महाविकास आघाडी अथवा महायुतीला आमचा पाठिंबा असेल. आम्ही मुद्यावर लढतोय आम्हाला विधानसेभेची अपेक्षा नाही. मुद्दा मान्य झाला तर ज्यांनी मान्य केला त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणायला आमची काही हरकत नाही. पण, योजना कोणासाठी हेही पहिलं पाहिजे, अशा शब्दांत सध्या सरकारच्या घोषणांच्या पावसावर भाष्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com