Bacchu Kadu Advice To Govt : बच्चू कडूंचा सरकारला अजब सल्ला; ‘पैसे नसतील तर गव्हर्नरचा 40 एकरांवरील बंगला विका’

Maharashtra State Government : राज्यपालांना चाळीस एकरांवरील बंगला कशाला पाहिजे. तो विका, त्यातून एक लाखभर कोटी रुपये नक्की येतील. राज्यपालांना चार ते पाच मजली चांगला बंगला बांधून द्यावा.
Bacchu Kadu-Rajbhavan
Bacchu Kadu-RajbhavanSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 July : माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारला एक अजब सल्ला दिला आहे. विविध योजना राबविण्यासाठी पैसे नसतील, तर सराकरला माझा एक सल्ला आहे. मुंबईत गव्हर्नरचा चाळीस एकर क्षेत्रावर बंगला आहे.

तो विका, त्याचे एक लाखभर कोटी रुपये येतील. त्यातून सरकारने कष्टकऱ्यांसाठी एखादी योजना राबवावी, असा सल्ला आमदार कडू यांनी सरकारला दिला आहे.

आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे आज (ता. 29 जुलै) उदगीर-लातूरच्या दौऱ्यावर जात असताना सोलापूरच्या (Solapur) शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

ते म्हणाले, देशात मोठी आर्थिक विषमता आहे. येथे जाती धर्मामध्ये विषमता आहे. पण खरी विषमता ही आर्थिक आहे. शेतकरी, कष्टकरी, मजूर, कंत्राटी कामगार, आशा सेविका आदींच्या कष्टाची किमत केली जात नाही. कष्ट करणाऱ्यांना कमी पैसे मिळतात आणि एजंटांना जास्त पैसे मिळतात. अनेक योजना ही निवांत बसून असणाऱ्यांसाठीच आहेत. मग काम न करणाऱ्यांसाठी सरकार आहे का, अशी परिस्थिती आहे.

कष्ट करणाऱ्याला पैसे दिले पाहिजेत. पैसे नसतील तर सरकारला माझा एक सल्ला आहे. मुंबईत गव्हर्नरचा बंगला चाळीस एकर क्षेत्रावर आहे. राज्यपालांना चाळीस एकरांवरील बंगला कशाला पाहिजे. तो विका, त्यातून एक लाखभर कोटी रुपये नक्की येतील. राज्यपालांना चार ते पाच मजली चांगला बंगला बांधून द्यावा. ती जागा पाहिली तर त्यातून कष्टकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबवता येतील, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

सरकारने कष्ट करणाऱ्यांचे मूल्य जपले पाहिजे. दिव्यांग, कष्टकरी यांचा बजेटमध्ये किती वाटा आहे, हे आम्ही विचारतोय. श्रीमंत अधिक श्रीमंत होण्याचं आम्ही तोडतोय, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Bacchu Kadu-Rajbhavan
Bacchu Kadu : बच्चू कडू महायुतीला देणार धक्का; मनोज जरांगेंना सोबत घेऊन विधानसभा लढविण्याचे संकेत

संभाजीराजेंच्या लोकांनी विशाळगडावर उपद्रव केलेला नाही

विशाळगडप्रकरणी बच्चू कडू म्हणाले, संभाजीराजेंच्या लोकांनी विशाळगडावर कोणताही उपद्रव केलेला नाही. पायथ्याशी जे घडलं, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. गड किल्ले राष्ट्रीय संपत्ती आहे, त्याचे रक्षण झाले पाहिजे. अतिक्रमणही हटवली पाहिजेत. गडाच्या पायथ्याशी धर्मस्थळ होते. त्याचा आणि गडावरील अतिक्रमणांचा काही संबंध नव्हता.

‘त्यांचे हात पाय तोडा’

ज्यांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मशिदीचे नुकसान केले, त्यांना शिक्षा दिली पाहिजे. आम्ही धर्म पाहत नाही. शिवरायांनी कधी जात पाहिली नाही, रयतेला महत्व दिले आहे. आम्ही संभाजीराजेंची नुकतीच भेट घेतली. त्या भेटीत विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत निघाला होता. ज्यांनी कोणी विद्‌ध्वंस केला आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. माझा कार्यकर्ता असला तरी हात पाय तोडले पाहिजेत, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Bacchu Kadu-Rajbhavan
MLA Disqualification Case : महाराष्ट्रात दोन दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी; आमदार अपात्रता प्रकरणी राष्ट्रवादीची आज, शिवसेनेची उद्या ‘सर्वोच्च’ सुनावणी

पवारांनी ते विधान का केलं, माहिती नाही

महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल, या शरद पवारांच्या विधानावरही बच्चू कडू यांन प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र आणि मनिपूरची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे मणिपूरसारखी स्थिती महाराष्ट्रमध्ये येईल, असं मला वाटतं नाही. शरद पवारांनी असं विधान का केलं, तेही मला माहिती नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com