Ambadas Danve News : महिला, मुलींवरील अत्याचार वाढलेत लक्ष द्या, तरुणाने रक्ताने लिहले पत्र..

Shivsena : आपल्या सर्वांच्या हातून ही परिस्थिती बाहेर जाईल. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात यावर गंभीर चर्चा करावी.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. विशेष बाब म्हणजे सदरील सर्व घटना प्रेम प्रकरणातून घडलेले आहेत. मुलींना एकतर्फी प्रेमातून विहिरीत, नाल्यात मारून फेकून दिले जात आहेत. (Ambadas Danve News) परंतु महिलांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी खंत व्यक्त करत एका तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहले.

Ambadas Danve News
Sandipan Bhumre News : शिंदेसेनेच्या आमदार, मंत्र्यांना अध्यात्माचा ओढा ; भुमरेंकडूनही शिवमहापुराण कथेचे आयोजन..

महिला, मुलींवरील अत्याचार थांबवा, अशी मागणी देखील या तरुणाने पत्रातून केली आहे. दरम्यान, (Maharashtra) महाराष्ट्राचा सुजाण नागरिक दीपेश पाटील याने मुलींवर होणाऱ्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. मी शब्द देतो की यंदाच्या अधिवेशनात हा विषय नक्की माझ्याकडून मांडला जाईल.

लोकांना माझी विनंतीही राहील की अशा पद्धतीने पत्र लिहून स्वतःला त्रास करून घेऊ नका, असे आवाहन अंबादास दानवे यांनी तरुणांना केले आहे. (Shivsena) आपली तळमळ माझ्याकडून नक्की ऐकली जाईल, असे म्हणत त्यांनी या पत्राची दखल घेतली. पाटील याने आपल्या पत्रात म्हटले आहे की, आपण बघत असाल की, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. विशेष बाब म्हणजे सदरील सर्व घटना प्रेम प्रकरणातून घडलेले आहेत.

मुलींना एकतर्फी प्रेमातून विहिरीत, नाल्यात मारून फेकून दिले जात आहेत. खरंतर आपल्याकडे राजकीय अस्थिरतेतीच जास्त चर्चा केली जात आहेत, परंतु महिलांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी आपणास विनंती करतो की, सबब घडणाऱ्या घटनांवर अंकुश कसा लावता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या. नाहीतर आगामी काळात महिलांवरील या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यानंतर आपल्या सर्वांच्या हातून ही परिस्थिती बाहेर जाईल. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात यावर गंभीर चर्चा करावी, अशी विनंती तरुणाने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com