Beed Ashti MLA News: आमदार धस विकास कामात अडथळे आणत आहेत..

Mla Ajabe-Dhas News: आष्टी मतदारसंघातील जलजीवनच्या कामात होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आपण करणार.
Mla Dhas-Ajabe News
Mla Dhas-Ajabe News Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा आणि तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी महत्वाचा असेला खुंटेफळ प्रकल्प आणि आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामावरून दोन आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकल्पात व्यवहार पाहिला, जनतेचे हित नाही, असा आरोप केला आहे.

Mla Dhas-Ajabe News
Ambadas Danve On Shinde-Pawar : अजित पवारांना मुख्यमंत्री अन् शिंदेना अर्थमंत्री करा, दानवेंचा अजब सल्ला..

शासनाने काढलेली कामाची निविदा चुकीचे आहे असे म्हणणे कितपत योग्य आहे ? कोण चुकीचे आणि कोण बरोबर हे मतदारसंघातील जनतेला चांगले माहिती आहे. (Suresh Dhas) धस यांनी खुंटेफळ प्रकल्पाच्या भूसंपादन आणि इतर कामात फक्त व्यवहार पाहिला शेतकऱ्यांचे हित नाही. (Beed News) आष्टी उपसा सिंचन प्रकल्पालाच्या ई-निविदेला धस यांच्या पञामुळेच स्थगिती मिळाली, अशी टीका देखील आजबे यांनी केली.

मतदारसंघाच्या विकासकामात धस अडथळा निर्माण करीत आहेत. आष्टी तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका आहे. (Balasaheb Ajbe) महाराष्ट्र शासनाने काढलेली निविदा ही चुकीची आहे असे म्हणण्याइतपत मी हुशार नाही. परंतु जे अतिहुशार निविदा चुकीचे आहे म्हणत आहेत, त्यांनी याची शहानिशा करावी. विनाकारण विकास कामांमध्ये अडथळा निर्माण करून प्रत्येक गोष्ट मीच केली असे म्हणणे चुकीचे आहे.

खुंटेफळ प्रकल्पात पाणी आले तर तालुक्यातील दुष्काळ हा कायमचा मिटेल. परंतु धस यांना या प्रकल्पात पाणी येऊ द्यायचेच नाही हेच यावरून दिसते आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या ई-निवेदेला स्थगिती मिळावी यासाठी धस यांनी उपमुख्यमंञी फडणवीसांना पञ दिले होते. त्यामुळे स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती उठविण्यात यावी, अशी मागणी आपण उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत ते सकारात्मक आहेत.

परंतु आपणच तालुक्याचा विकास करत असल्याचे धस दाखवत आहेत. श्रेय घ्यायचे असेल तर घ्या, पण मतदारसंघाच्या विकासात आडवे येऊ नका, असे आजबे म्हणाले. खुंटेफळ प्रकल्पासाठी मूळ मालकांकडून जमिनी कार्यकर्त्यांच्या नावावर कोणी खरेदी केल्या आहेत? जमिनी घेऊन त्या विकसीत केल्याचे दाखवून शासनाची कोट्यवधींची फसवणूक धस यांनी केली आहे, असा आरोप आजबे यांनी केला.

Mla Dhas-Ajabe News
Sadabhau Khot On Tomato Price: दोन-तीन महिने कळ काढा, नंतर सरण रचायला टोमॅटो वापरा; माजी मंत्री सदाभाऊंचं वादग्रस्त विधान!

मावेजाच्या यादीत स्थानिकच्या शेतकऱ्यांपेक्षा बाहेरच्या शेतकऱ्यांची जास्त नावे आहेत. खुंटेफळ प्रकल्प आणि स्थलांतर होणाऱ्या ठिकाणी जमिनींची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली असुन काही आधिकाऱ्यांनी देखील येथे जमिनी खरेदी केल्याचा आरोप आजबे यांनी केला. आष्टी तालुक्यातील जलजीवन योजनेत मोठा भ्रष्टाचार होत आहे. अनेक गावांच्या जवळ चांगले व शाश्वत जलस्रोत असून देखील लांबचे स्रोत निवडले आहेत.

यामुळे अनेक गावांना खरेच पाणी मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. भ्रष्टाचारामुळे ही योजना असफल होईल आणि पाण्यासाठी लोकांना ञास सहन करावा लागेल. पुढील वीस-पंचवीस वर्षे जलजीवन योजना राबविलेल्या गावांना पाणीपुरवठ्याची योजना येणार नाही. जलजीवनचे कामे दर्जेदार होणे गरजेचे आहे. सध्या आष्टी मतदारसंघातील जलजीवनच्या कामात होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आपण करणार असल्याचे आजबे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com