Shivsena News : संजय शिरसाट मंत्रीमंडळ बैठकीत व्यस्त, इकडे संभाजीनगरात प्रदीप जैस्वाल यांनी घेतली बैठक!

While Minister Sanjay Shirsat was engaged in the cabinet meeting, MLA Pradeep Jaiswal convened a separate meeting with party office-bearers. : शिरसाट हे मंत्रीमंडळ बैठकीसाठी गेलेल्या असल्यामुळे ते शहरात परतल्यावरच महापालिकेच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने तयारी सुरू होईल.
Mla Pradip Jaiswal, News
Mla Pradip Jaiswal, NewsSarkarnama
Published on
Updated on

Municipal Corporation Election : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्यानंतर शिवसेना (शिंदे) पक्षातील जैस्वाल गट कामाला लागला असून शिरसाट गटात मात्र सध्यातरी सामसूम दिसत आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मंगळवारी (ता. 6) फक्त आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत पूर्व तयारीवर चर्चा केली. दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट यांच्या गटात मात्र हालचाल नव्हती.

शिरसाट हे मंत्रीमंडळ बैठकीसाठी गेलेल्या असल्यामुळे ते शहरात परतल्यावरच महापालिकेच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने तयारी सुरू होईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेनेत (शिंदे) आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) आणि मंत्री संजय शिरसाट यांचे दोन गट आहेत. या दोन्ही नेत्यांचे पटत नसल्याने सध्या तरी दोन पक्ष असल्यासारखे वातावरण आहे. या दोन नेत्यांतील रस्सीखेच सातत्याने सुरु असते. शहरातील शिवसेनेवर वर्चस्व ठेवण्यावरून या दोन्ही नेत्यात संघर्ष प्रारंभापासून आहे.

मंत्री झाल्यावर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संघटनेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र ज्या मध्य मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे, तो भाग प्रदीप जैस्वाल यांनी बांधून ठेवला असल्याने तिकडे शिरसाट यांना शिरकाव करता आलेला नाही. यावरून वेळोवेळी दोन्ही गटांत धुसफूस होतच असते. एकेकाळी जैस्वाल यांच्यासाठी शहर विकास आघाडी वाढवणारे राजेंद्र जंजाळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत, पण ते शिरसाट यांच्या गटात आहेत.

Mla Pradip Jaiswal, News
Ajit Pawar On Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या आदळाआपटवर अजितदादांचे सूचक विधान; म्हणाले, ‘...तर राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील’

दुसरीकडे नव्याने शिवसेनेत आलेले किशनचंद तनवाणी जैस्वाल यांचे जुने मित्र असले तरी ते अद्याप सक्रिय झालेले नाहीत. अशा सगळ्या परिस्थितीत महानगरपालिकेच्या राजकारणावर पकड असलेल्या जैस्वाल यांनी आज सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केल्यानंतर मध्य मतदारसंघातील विविध विभागांतील प्रमुख पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवासेना व महिला आघाडीच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक घेत निवडणूक पूर्वतयारीवर मार्गदर्शन केले.

Mla Pradip Jaiswal, News
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची?, कधी असणार सुनावणी

शाखा स्तरावर कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करीत आगामी निवडणुकीत स्थानिक प्रश्न, जनतेच्या गरजा आणि विकासकामांचा आढावा घेत निवडणूक प्रचाराची रणनीती आखण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवण्याच्या सूचना जैस्वाल यांनी बैठकीत दिल्या. शिवसेनेच्या स्थापनेपासून प्रदीप जैस्वाल महापालिकेच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्याचा राजकारणातील श्रीगणेशाच महापालिकेतून झाला. नगरसेवक आणि महापौर राहिलेल्या जैस्वाल यांचा महापालिकेचा दांडगा अभ्यास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com