MLA Prashant Bamb : बंगल्याची दुरुस्ती, कारच्या चॉइस नंबरसाठी सरकारी पैसा; मनपा आयुक्तांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा!

MLA Prashant Bamb has made serious allegations against Chhatrapati Sambhajinagar Municipal Commissioner G. Srikanth. : आपत्कालीन परिस्थितीत वापरायचा निधी अधिकार नसताना त्यांनी स्वतःचा बंगला आणि स्विमिंग पूल बांधण्यासाठी केल्याचा आरोप बंब यांनी केला. तब्बल दोन कोटी रुपये विना निविदा खर्च करण्यात आले.
Commissioner J Shrikant-MLA Prashant Bamb News
Commissioner J Shrikant-MLA Prashant Bamb NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी विधानसभेत केली. अधिकार नसताना बंगल्याच्या दुरुस्तीवर लाखोंचा खर्च, कारच्या चॉइस नंबरसाठी सरकारी पैशाचा गैरवापर याशिवाय लाखो रुपये बंगल्यातील साबण, डिटर्जंटवर दरमहा खर्च करणारे जी. श्रीकांत हे राज्यातील पहिलेच आयएएस अधिकारी असतील, अशी टीकाही बंब यांनी केली.

महापालिका आयुक्त जी. श्रीकांत व इतर अधिकार्‍यांवर कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आमदार प्रशांत बंब यांनी खळबळ उडवून दिली. (Municipal Corporation) मनपा आयुक्त आणि त्यांनी खास बदली करून आणलेले अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असून शासनाच्या निधीचा गैरवापर करत आहेत. या सर्वांची पाच आमदारांच्या समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी बंब यांनी सभागृहात केली.

राज्य आणि केंद्राकडून मनपाला मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचे ऑडिट करण्यात आलेली नाही. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून मनपा आयुक्त जी. श्रीकांत, अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे ,विनायक देशमुख, रवींद्र जोगदंडे, एम.काजी यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बंब (Prashant Bamb) यांनी केली आहे.

Commissioner J Shrikant-MLA Prashant Bamb News
Municipal Commissioner G. Shrikant : आता फाईल गायब होणार नाही! मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा 'ई ऑफिस'वर भर..

आपत्कालीन निधी वापरला

श्रीकांत यांचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असून आपत्कालीन परिस्थितीत वापरायचा निधी अधिकार नसताना त्यांनी स्वतःचा बंगला आणि स्विमिंग पूल बांधण्यासाठी केल्याचा आरोप बंब यांनी केला. तब्बल दोन कोटी रुपये विना निविदा खर्च करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर दोन गाड्यांच्या चॉइस नंबरसाठी प्रत्येकी 22 हजार रुपये याच निधीतून आयुक्तांनी मोजल्याचे त्यांनी सांगितले.

Commissioner J Shrikant-MLA Prashant Bamb News
Municipal Elections : तयार राहा! अजित पवारांनी सांगून टाकलं महापालिका निवडणुका कधी होणार, दोन टप्प्यात जिल्हा परिषद अन्...

बंगल्यातील साबण, डिटर्जंट पावडर यावर तब्बल अडीच लाख रुपये दर महिन्याला खर्च करण्यात आल्याचे दाखवले आहे. यासह रस्त्याच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही बंब यांनी केला. काही महिन्यांपूर्वी प्रशांत बंब यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून माहिती मागवली होती. परंतु त्यांच्या पत्राला कुठलेही उत्तर मनपा प्रशासनाकडून देण्यात आले नव्हते.

Commissioner J Shrikant-MLA Prashant Bamb News
MLA Prashant Bamb News : आमदार प्रशांत बंब यांना महापालिकेने चार महिन्यानंतर माहिती दिली, पण नाराजी कायम!

आमदाराने मागितलेली माहिती सहा सहा महिने दिली जात नसेल तर सर्व सामान्यांचे काय? असे म्हणत बंब यांनी महापालिकेत दोन तास ठिय्या दिला होता. त्यानंतर आता प्रशांत बंब यांनी थेट विधिमंडळात महापालिका आयुक्त यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्याची सविस्तर माहिती आणि कागदपत्रे, पुरावे सभागृहात सादर केले. एवढेच नाही तर आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी जी. श्रीकांत यांनी सेवा केली त्या सगळ्याच ठिकाणी त्यांच्यावर गैर व्यवहाराचे आरोप झाले होते,असा दावाही बंब यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com