Prashant Bamb News: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेनंतर आमदार प्रशांत बंब यांनी वळवला पुन्हा महापालिकेकडे मोर्चा

Chhatrapati Sambhajinagar Politics: गंगापूरचे आमदार प्रशांत बंब मंगळवारी (ता. नऊ) महापालिकेत दाखल झाले. त्यांनी आयुक्तांच्या भेटीनंतर स्थायी समिती सभापती, उपमहापौरांसह विरोधीपक्षनेत्याच्या दालनात जाऊन सदिच्छा भेट घेतली
Prashant Bamb municipal corporation campaign
Prashant Bamb municipal corporation campaignSarkarnama
Published on
Updated on

Prashant Bamb civic administration issues: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत धडक देऊन भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी प्रशासकांच्या काळात कोट्यावधींची बोगस बिले उचलून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

तत्कालीन प्रशासक मीना यांचे नाव घेत बंब यांनी आरोप केल्यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडे आमदार प्रशांत बंब यांनी आपला मोर्चा वाढवला होता.

महापालिकेत भाजपची शतप्रतिशत सत्ता आणि महत्त्वाच्या पदावर उपमहापौर वगळता सर्वत्र भाजपचे पदाधिकारी असताना प्रशांत बंब नेमका आता महापालिकेतील कोणता भ्रष्टाचार उघडकीस आणणार? अशी चर्चा त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

गंगापूरचे आमदार प्रशांत बंब मंगळवारी (ता. नऊ) महापालिकेत दाखल झाले. त्यांनी आयुक्तांच्या भेटीनंतर स्थायी समिती सभापती, उपमहापौरांसह विरोधीपक्षनेत्याच्या दालनात जाऊन सदिच्छा भेट घेतली.

प्रशासकीय कारभार असताना आमदार बंब यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत गतवर्षी महापालिकेत ठिय्या दिला होता. पण यावेळी भाजपची महापालिकेत सत्ता असताना त्यांनी आयुक्तांची भेट घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

आमदार प्रशांत बंब मंगळवारी सकाळी महापालिकेत आले. त्यानंतर त्यांनी आयुक्तांची भेट यावर माध्यमांना माहिती दिली. प्रशासक काळात या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठी अनियमितता झाली आहे, कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आले आहेत. याबद्दल यापूर्वीही आपण पत्रव्यवहार केला होता, प्रत्यक्ष भेटून या बद्दलची माहिती विचारली होती. त्यावर काय कारवाई करण्यात आली हे जाणून घेण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली.

Prashant Bamb municipal corporation campaign
Aurangabad DCC Bank News: समीर सत्तारांचा अर्ज बाद करण्याचं कारण हास्यास्पद; अपिलात आमचा अर्ज शंभर टक्के टिकेल, अब्दुल सत्तारांचा दावा

यावेळी अधिकारी देखील उपस्थित होते. कोणत्याही मुद्यांची माहिती अधिकाऱ्यांना देता आली नाही, त्यामुळे आयुक्तांनी सर्व माहिती घेऊन तुम्हाला चर्चेसाठी बोलावतो, असे सांगितले आहे. प्रशासकांच्या विशेषाधिकारात कोणत्याही प्रकारची निविदा न काढता प्रशासकांसह अधिकाऱ्यांचे बंगले सजवण्यात आले, याबद्दल देखील आयुक्तांना माहिती दिली व कारवाईबद्दल प्रश्न विचारला. आयुक्तांनी याबद्दल माहिती घेतो असे सांगितल्याचे बंब म्हणाले.

कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेबद्दलही आयुक्तांकडे तक्रार केल्याचे बंब म्हणाले. निविदा भरली एका एजन्सीने, काम करते दुसरीच एजन्सी. त्या एजन्सीकडून कचऱ्यावर प्रक्रिया न करता तो दुसरीकडे टाकण्यात येतो. आयुक्तांनी या बद्दल स्वतंत्र बैठक घेण्याचे मान्य केले असा उल्लेख बंब यांनी केला.

Prashant Bamb municipal corporation campaign
Narhari Zirwal News: बिथरलेल्या गुटखामाफियांनी 'FDA' च्या महिला अधिकाऱ्याच्या अंगावरच घातली गाडी; मंत्री झिरवाळांंचा मुंढेंना कारवाईसाठी 'फ्री हँड'

दोन दिवसात जिल्हा परिषद आणि महापालिकेत भेट देत प्रशासक काळातील भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढत प्रशांत बंब यांनी प्रशासक राज विरोधात मोहीम उघडली असल्याचे त्यांच्या या भेटीगाठीवरून स्पष्ट होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com