Marathwada RSP News : पंकजाताई यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदर असून त्यांच्यासाठी गंगाखेड मतदारसंघ सोडण्यास माझी तयारी आहे, असे स्पष्टीकरण गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिले आहे. (MLA Ratnakar Gutte News) भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी नुकतेच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता असताना आमदार रत्नाकर गुट्टे यांचा त्याला विरोध होता, असा दावा एका कार्यक्रमात केला होता.
राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा होत असताना बाहेरून कोणीही आले तरी आम्ही त्यास पुरून उरू असे वक्तव्य गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी केले होते. यासंदर्भात पंकजाताईंचा मी सन्मान करतो. त्यांनी इथे यावे मी त्यांच्यासाठी जागा खाली करेन. (BJP) विधानसभा निवडणुकीत पंकजाताई यांचा पराभव झाल्यानंतर कारागृहात असतानासुध्दा मी आमदारकीचा राजीनामा दिला होता.
वास्तविक गंगाखेड मतदारसंघात (Parbhani) परभणीहून उमेदवार येणार असल्याने मी तसे वक्तव्य केले. मात्र विरोधकांनी त्याचा संबंध पंकजाताईशी जोडला. तुमची कुंडली माझ्याकडे, योग्य वेळ येताच तुमचे कारनामे बाहेर काढेन, असा इशाराही गुट्टे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांना नाव न घेता दिला. माझ्यावर गुंडगिरीचे आरोप करतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मतदारसंघातील नागरिकांना न्याय देण्याचे काम मी केले आहे. याला गुंडगिरी म्हणत असाल तर, न्याय देण्यासाठी मी गुंडगिरी करेन. मात्र तुम्ही आतापर्यंत काय केले याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. तुमची कुंडली माझ्याकडे आहे, योग्य वेळ येताच मी सर्व बाहेर काढेन. किबहुना माझे कार्यकर्तेच हे काम करतील. मग मात्र बाहेर तोंड काढणे कठीण होऊन बसेल, असा दमही गुट्टे यांनी भरला.
माझ्यावर आरोप करणारांनी निवडणुकीत उभे राहावे. जनता काय ते ठरवेल. मात्र त्यांनी भाजपमध्येच राहावे व भाजपचेच काम करावे. इकडून तिकडे उड्या मारण्याचे काम करू नये. गंगाखेड,पालम व पूर्णा तालुक्यातील जनताच माझा परिवार आहे. साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णत: फेडले असून यासंदर्भात बँकेने वृत्तपत्रात जाहिराती देऊन सर्व माहिती उघड केली आहे, असेही गुट्टे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार रत्नाकर गुट्टे व भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्यात संघर्ष पेटल्यामुळे भाजप नेतृत्वाची मोठी डोकेदुखी वाढली आहे. संतोष मुरकुटे यांच्याविरोधात तरुणीने केलेल्या तक्रारीवरून हा संघर्ष पेटला. माझ्यावर झालेले आरोप खोटे असून गुट्टे यांनी माझ्याविरुद्ध केलेले हे षडयंत्र आहे असा आरोप मुरकुटे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.