Santosh Bangar vs Ayodhya Pol : आमदार बांगरांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याचा दावा; ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ अडचणीत

Politics News : आमदार संतोष बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याचा दावा ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी केला होता.
Ayodhya Pol
Ayodhya Pol

Hingoli News : कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतात. आमदार संतोष बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याचा दावा ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी केला होता. संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरातील घरासमोर फायरिंग झाल्याच्या चर्चा होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पोलिसानी केली.

आमदार बांगर (Santosh Bangar) यांच्या घराबाहेर 27 मे रोजी फायरिंग झाल्याचं ट्वीट ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी केले होते. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता ही अफवा असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी अयोध्या पोळं यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Shivsena News)

Ayodhya Pol
Devendra Fadanvis On Jitendra Awhad: मनुस्मृती-आव्हाड वादावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश..."

उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) नेत्या अयोध्या पोळ यांच्या विरोधात हिंगोली पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे. पोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरापुढे गोळीबार झाल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात गोळीबार झाला नसल्याचे निष्पन्न झाल्याने, हिंगोली पोलिसांनी खोटी अफवा पसरून जनतेच्या मनात भीती निर्माण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, "विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार परवा संतोष बांगर यांच्या घरासमोर आधी शिवीगाळ अन नंतर फायरिंग झाली होती म्हणे? सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं काय खोटं सांगतील का?" असे अयोध्या पौळ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांनी आणखी एक ट्वीट केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, "विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार दुसरी माहिती अशी की प्रकरण दाबून ठेवले जावे म्हणून संतोष बांगर यांच्याकडून काटेकोरपणे पालन केले गेले म्हणे? सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं काय खोटं सांगतील का?" असेही ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, या आरोपांनंतर आमदार संतोष बांगर यांनी असे काहीही झालेले नाही, काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्या तपासानंतर गोळीबार झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यानंतर हिंगोली पोलिसांनी खोटी अफवा पसरून जनतेच्या मनात भीती निर्माण केल्याचा आरोप करत पोळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Ayodhya Pol
Santosh Bangar News : आमदार बांगरांचा खळबळजनक दावा; तर ठाकरे गटाचे नेते...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com