Beed Political News : डीपीडीसीतून हटवले, पण आमदार धस यांच्या तक्रारींची अजित पवारांनी घेतली गंभीर दखल!

MLA Suresh Dhas raised serious allegations, which were taken seriously by Ajit Pawar. Read about the political developments and reactions here : भाजपचे आमदार सुरेश धस यांनी डीपीसी बैठकीत अनेक मुद्दे उपस्थित करत बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराचे पुरावे असणारा पेनड्राईव्हच अजित पवारांना दिला होता.
Suresh Dhas- Ajit Pawar-Dhananjay Munde News
Suresh Dhas- Ajit Pawar-Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा दौरा आणि जिल्हा नियोजन समिती बैठकीची चर्चा अजूनही राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी रान पेटवत दररोज नव नवे आरोप करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांना डीपीडीसीतून हटवत मोठा दणका दिला. बैठकीतही त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर 'लय मागच काढू नका' म्हणत सुनावले. मात्र त्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत अजित पवार यांनी डीपीडीसीतील मागील दोन वर्षांच्या निधीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

यासाठी तीन सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली असून (Ajit Pawar) अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाचे वेगळेपण दाखवून दिल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. खंडणी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हा राज्यात आणि देश पातळीवर पोहचला. या प्रकरणात धनंजय मुंडे व त्यांचे विश्वासू सहकारी वाल्मीक कराड याचे नाव आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले.

वाल्मीक कराडसह इतर आरोपी एसआयटीच्या ताब्यात आहेत. तर (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा,यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांनी मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळणाऱ्या अजित पवार यांनी बीड जिल्हा नियोजन समितीचा निधी आणि त्यातून झालेल्या कामातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची मात्र गंभीर दखल घेतली आहे.

Suresh Dhas- Ajit Pawar-Dhananjay Munde News
Beed Politics Video : अजितदादांच्या समोरच बजरंग सोनवणे धनंजय मुंडे भिडले! दहशतीचा मुद्दा निघालाच...

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी डीपीसी बैठकीत अनेक मुद्दे उपस्थित करत बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराचे पुरावे असणारा पेनड्राईव्हच अजित पवारांना दिला होता. बीडहून मुंबईत परतल्यानंतर अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षात झालेल्या कामांची तसेत वितरित करण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या दोन वर्षांच्या निधीची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर नियोजन विभागाने तातडीने त्यावर कार्यवाही सुरू केली.

Suresh Dhas- Ajit Pawar-Dhananjay Munde News
Suresh Dhas: सुरेश धसांनी अजितदादांना दिलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये दडलंय काय? 500 जण कोमात...

यासाठी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर काम पाहणार आहेत. तर मुंबई अर्थ व सांख्यिकी संचालनालयचे अपर संचालक म. का. भांगे सदस्, जालना जिल्ह्याचे नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

Suresh Dhas- Ajit Pawar-Dhananjay Munde News
Ajit Pawar News : एकाचवेळी आमदार धस अन् सोळंकेंचा पत्ता कट; अजितदादांचा मुंडेंविरोधातली धार कमी करण्याचा प्लॅन

ही समिती डीपीसीच्या योजनेतून 2024-25 मध्ये मंजुरी मिळालेली कामे, त्यांना मिळालेल्या प्रशासकीय मंजूरी यासह 2024-24 मधील सर्व कामांची सद्यस्थिती, कार्यारंभ आदेश, निधी वितरण व झालेली कामे याची करण्यात येणार आहे. यासाठी समितीला आठवडाभराची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर हा अहवाल सादर सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. नुकताच आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना 73 कोटींवर ढपला मारल्याचा आरोप केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com