MLA Vilas Bhumre Oath News : पैठणच्या आमदाराने घेतली सव्वा महिन्यानंतर शपथ!

MLA Vilas Bhumre took oath of office and secrecy after one and a half months: प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या दोन दिवस आधीच विलास भुमरे हे आपल्या निवासस्थानी चक्कर येऊन पडले. धावपळ, दगदग आणि पुरेशी झोप न झाल्यामुळे ते पायऱ्यावरून कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.
Eknath Shinde, Vilas Bhumre
Eknath Shinde, Vilas BhumreSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या पैठण मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी आज सव्वा महिन्यानंतर पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी पैठणमधून (Shivsena) शिवसेनेचे उमेदवार असलेले विलास भुमरे हे घरात भोवळ येऊ पडल्यामुळे त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांनी गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यापासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यामुळे राज्यात सत्तांतर होऊन झालेल्या पहिल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विलास भुमरे यांना पद आणि गोपनियतेची शपथ घेता आली नव्हती. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विलास भुमरे यांना आपल्या दालनात आमदारकीची शपथ दिली. यावेळी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) हे उपस्थित होते.

Eknath Shinde, Vilas Bhumre
Shivsena UBT News : हात जोडतो, पाया पडतो कोणी कुठेही जाऊ नका; शिवसैनिकांच्या मेळाव्यात खैरेंचे साष्टांग दंडवत!

संदीपान भुमरे यांनी 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर पैठण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दत्ता गोर्डे यांना त्यांच्याविरोधात मैदानात उतरवले होते. निवडणुक प्रचारा दरम्यान, प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या दोन दिवस आधीच विलास भुमरे हे आपल्या निवासस्थानी चक्कर येऊन पडले.

Eknath Shinde, Vilas Bhumre
Mahayuti News: शिंदेंकडे असलेल्या विभागाच्या पतंगाचा दोर फडणवीसांकडे; शिंदे गटातल्या मंत्र्यांमध्ये चलबिचल

प्रचाराची धावपळ, दगदग आणि पुरेशी झोप न झाल्यामुळे ते पायऱ्यावरून कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे शेवटच्या दोन दिवस पैठण मतदारसंघात त्यांना प्रचाराला सुद्धा जाता आले नाही. त्यानंतरही विलास भुमरे यांनी पैठण मतदारसंघातून 29 हजारांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवार दत्ता गोर्डे यांचा पराभव केला.

Eknath Shinde, Vilas Bhumre
Paithan Assembly Constituency : विकासकामांच्या जोरावरच निवडणुकीला सामोरे जातोय..

महायुतीने राज्यात दोनशे पार आमदार निवडून आणत बहुमताने सत्ता मिळवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 7 ते 9 डिसेंबर दरम्यान, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. विलास भुमरे यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्यामुळे त्यांना रुग्णालयातच राहावे लागले.

Eknath Shinde, Vilas Bhumre
Abdul Sattar Meet Vilas Bhumre : अब्दुल सत्तार लागले कामाला; भेटीगाठीतून घेणार नाराजांचा कानोसा!

विधानसभा अध्यक्षांना या संदर्भात माहिती देण्यात आली होती. विलास भुमरे यांची प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांना आमदारकीची शपथ दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यानूसार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात विलास भुमरे यांना शपथ देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com