Paithan Assembly Constituency : विकासकामांच्या जोरावरच निवडणुकीला सामोरे जातोय..

Elections are based on the development work done in Paithan Constituency : पैठण विधानसभा मतदारसंघात सीसी रस्ते, डांबरी रस्ते व पाणंद रस्त्यांच्या निर्मितीने पैठणचा चेहरा बदलला आहे. रस्त्यांचे डांबरीकरण आणि रुंदीकरणामुळे स्थानिकांच्या सोयी-सुविधा वाढल्या आहेत.
Vilas Bhumre Paithan Constituency
Vilas Bhumre Paithan ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या कार्यकाळात साडेसहा हजार घरकुल पैठण विधानसभा मतदारसंघात मंजूर केले. नाथ मंदिराचा विकास केला, संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट केला. पंढरपुरात भक्त निवासचे काम प्रगती पथावर आहे. त्यामुळे या विकासकामांच्या जोरावर सर्वाना सोबत घेऊनच निवडणुकीला सामोरे जात असल्याचे महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांनी सांगितले.

पैठण विधानसभा मतदारसंघात सीसी रस्ते, डांबरी रस्ते व पाणंद रस्त्यांच्या निर्मितीने पैठणचा चेहरा बदलला आहे. (Paithan) रस्त्यांचे डांबरीकरण आणि रुंदीकरणामुळे स्थानिकांच्या सोयी-सुविधा वाढल्या आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 1900 स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

Vilas Bhumre Paithan Constituency
Paithan Assembly Constituency : तुमचा सेवक म्हणून काम करण्याची संधी द्या!

तसेच बिडकीन येथे आलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून 20,000 प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती उपलब्ध झाली आहे, असेही भुमरे यांनी सांगितले. (Shivsena) पैठण विधानसभा मतदारसंघातील धनगाव, इसारवाडी, मुधळवाडी, पिंपळवाडी, जायकवाडी, राहुलनगर, करंजखेडा, आखात वाडा, सोलानपूर, रहाटगाव येथी प्रचारसभेत ते सोमवारी बोलत होते.

Vilas Bhumre Paithan Constituency
Shivsena Party & Symbol Case : शिवसेना कोणाची? निकाल कधी? सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कार्यकाळात निकाल नाहीच

विकासाच्या माध्यमातून महायुती सरकारने शेतकरी, युवक, महिला हिताच्या योजना आणल्या. या योजनांमुळेच आज जनताही महायुती सरकारसोबत आहे. आपण विकासकामांमध्ये कधीही राजकारण केले नाही. येणाऱ्या काळात अनेक विकासकामे महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास दोन कोटी 40 लाख महिलांना या योजनेचा लाभ होत आहे.

Vilas Bhumre Paithan Constituency
Mahayuti And MVA : विधानसभा निवडणुकीत 'आश्वासनांची स्पर्धा'; पण आर्थिक स्थितीचे काय?

कर्जमाफी योजना त्याचबरोबर शेतकरी हिताचे निर्णय महायुतीच्या माध्यमातून घेतले जाणार असल्याचे भुमरे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे सरचिटणीस तुषार शिसोद, सूरज लोळगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अप्पासाहेब निर्मळ, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर चौधरी, उपजिल्हा प्रमुख विनोद बोंबले उपस्थित होते.

Vilas Bhumre Paithan Constituency
Paithan Assembly Constituency: पैठणमध्ये `एकनाथांची` पसंती भुमरेंनाच! मशाल-धनुष्यबाणाला भिडणार ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, शिवाजी भालसिंग, काकाभाऊ बर्वे, भाऊ लबडे, शिवाजी जाधव, रामा भोजने, गणेश जानकर, प्रशांत आव्हाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com