
Parbhani-Hingoli MLC News : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची २०१८ मध्ये झालेली निवडणूक अनेक प्रसंगांनी लक्षात राहण्यासारखी आहे. (MLA Viplav Bajoria News) अकोला येथील आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांनी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आणि विजय मिळवला. मात्र, परभणी-हिंगोलीकरांना त्यांचे दर्शन तसे दुर्मीळच.
विधान परिषदेच्या २०१८ मध्ये मुदत संपलेल्या (Parbhani) परभणी-हिंगोली व बीड, लातूर, धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली. दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मतदारांचे प्राबल्य होते. (Marathwada) बीड- लातूरमध्ये कॉंग्रेसचे आमदार दिलीप देशमुख, तर परभणी- हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी हे विजयी झाले होते.
मात्र, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून बीड-लातूर-धाराशिवमध्ये राष्ट्रवादी, तर परभणी-हिंगोली मतदारसंघात कॉंग्रेस अशी अदलाबदल केली. (Shivsena) बीड-लातूर-धाराशिवमध्ये राष्ट्रवादीकडून रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली, तर परभणी-हिंगोलीमध्ये कॉंग्रेसकडून माजी आमदार सुरेश देशमुख यांना.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अकोला येथील शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना अनपेक्षितपणे परभणी-हिंगोली येथील उमेदवारी जाहीर झाली. मतदारसंघाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तसेच परभणी-हिंगोली मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार स्थानिक असल्याने तसेच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे २९७ मतदार असल्याने आघाडीचा उमेदवार निवडून येईल, अशी सर्वांनाच खात्री होती.
मात्र, शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांनी २५६ मते मिळवत विजय प्राप्त केला. माजी आमदार सुरेश देशमुख यांना २२१ मते मिळाली. विजय दृष्टिपथात असताना माजी आमदार सुरेश देशमुख यांनी ऐनवेळी प्रचारातून अंग काढून घेतल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. स्थानिक उमेदवार असताना बाहेरचा उमेदवार निवडून आला, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये व्यक्त झाली होती.
निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर परभणी-हिंगोलीकरांना बाजोरिया यांचे दर्शन दुर्मीळच झाले. बोटावर मोजण्याइतक्या प्रसंगांना ते वर्षभरात परभणीत उपस्थित राहिले. शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर बाजोरिया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचे ठरवले. खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात शिंदे गटाला बळ देण्यासाठी बाजोरिया सक्रिय राहतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, अजूनपर्यंत तरी बाजोरिया यांच्याकडून तसे कुठलेच प्रयत्न झाले नाहीत.
दरम्यान, तेव्हा निवडणूक निकालाने आघाडीला नामुष्कीचा सामना करावा लागला होता. परभणी-हिंगोली मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवाराच्या निष्क्रीयतेमुळे शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला, तर बीड-लातूर धाराशिव येथील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी नाट्यमयरित्या माघार घेतली होती. आघाडीला अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला. अखेर अटीतटीच्या लढतीत भाजपचे सुरेश धस यांचा विजय झाला होता. विप्लव बजोरिया स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार असले तरी त्यांनी अधूनमधून तरी परभणी-हिंगोलीकरांची भेट घ्यावी, अशी अपेक्षा त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांनी व्यक्त केली आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.