Beed Crime News : निधी मिळवून देतो म्हणत सात लाखांची फसवणूक; आमदाराच्या पीए विरोधात गुन्हा दाखल!

An MLA’s personal assistant allegedly duped a person of ₹7 lakhs by falsely promising to help secure government funds. A case of fraud has been registered : 2024 - 25 या आर्थिक वर्षातील जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामांच्या टेंडरसाठी आमदार विक्रम काळे यांचे पी.ए. नयन जयराम शेजुळ याने फोनवर संपर्क साधला होता.
Beed Crime News
Beed Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Fir Filed News : राजकारणात चाय पेक्षा केटली गरम असा उल्लेख नेहमीच केला जातो. याचा अर्थ मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यापेक्षा त्यांचे पीएच अधिक रुबाब गाजवतात. याचा अनुभव अनेकांना येत असतो. आता चक्क एका आमदाराच्या पीएने एक कोटींचा निधी मिळवून देतो, असे सांगत एकाची सात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार विक्रम काळे यांचे ते पीए महाशय असल्याचे समोर आले आहे. 25/15 लेखा शिर्ष मधून सिमेंट रस्त्यांच्या कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळवून देतो म्हणून सहा लाख 70 हजार रुपयांची फसवूक केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

उत्तरेश्वर कारभारी खताळ (वय 30, रा. कान्हापूर, ता. वडवणी) यांनी ही फिर्याद दिली असून नयन जयराम शेजुळ (रा. छत्रपती संभाजीनगर) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. (Beed Crime News) नयन शेजुळ हा मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांचा खासगी सचिव असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Beed Crime News
Beed Crime News : विहिरीच्या मंजूरीसाठी वीस हजाराची लाच ; दहा हजार घेताना सरपंचावर एसीबीचा ट्रॅप!

उत्तरेश्‍वर खताळ यांच्या पत्नी राधा खताळ या सरपंच आहेत. 2024 - 25 या आर्थिक वर्षातील जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामांच्या टेंडरसाठी आमदार विक्रम काळे यांचे पी.ए. नयन जयराम शेजुळ याने फोनवर संपर्क साधला होता. बनावट मेलद्वारे टेंडर उपलब्ध करून देतो असे सांगून एक कोटींच्या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली.

Beed Crime News
Anti Corruption News : रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने अन् बरचं काही; आरडीसी खिरोळकरच्या घरात सापडले घबाड!

ऑगस्ट 2024 मध्ये त्याने जिल्हा परिषद आवारात 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात संभाजीनगरला बोलावून घेत सुहास लंगडे व समीर बशीर शेख यांच्या समक्ष सहा लाख 20 हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com