Anti Corruption News : रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने अन् बरचं काही; आरडीसी खिरोळकरच्या घरात सापडले घबाड!

Authorities conducted a raid at Deputy Collector Khiroalkar’s residence, recovering cash and valuable gold and silver ornaments in the process. : जमीन वर्ग दोनची असल्याने ती खरेदी करण्यासाठी लागणारे चलन भरणा करून देण्यासाठी दीपक त्रिभुवन व निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खेडकर यांनी 23 लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती.
Deputy Collector News Chhatrapati Sambhajinagar
Deputy Collector News Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : जमिनीची श्रेणी बदलून देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खेडकर यांनी लिपिकामार्फत लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता 13 लाख रुपये रोख, अर्धा किलो सोन्याचे दागिने आणि तब्बल साडेतीन किलो चांदीचे दागिने असा एकूण 67 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज आढळून आला.

छत्रपती संभाजीनगर येथे काल लाचलूचपत प्रतिबंधक (Anti Corruption News) विभागाने केलेल्या कारवाईने जिल्हा प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन याच्या मार्फत पाच लाख रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रचलेल्या सापळ्यात रोख रक्कम स्वीकारताना या दोघांना अटक करण्यात आली.

तिसगाव येथील सहा एकर 16 गुंठे जमीन ही वर्ग दोनची जमीन शासनाच्या परवानगीने खरेदी खत करून 2023 मध्ये विकत घेण्यात आली होती. (Chhatrapati Sambhajinagar) जमीन वर्ग दोनची असल्याने ती खरेदी करण्यासाठी लागणारे चलन भरणा करून देण्यासाठी दीपक त्रिभुवन व निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खेडकर यांनी 23 लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

Deputy Collector News Chhatrapati Sambhajinagar
Anti Corruption Bureau : पाच लाखाची लाच अन् उपजिल्हाधिकाऱ्यासह लिपीक जाळ्यात!

ही रक्कम तक्रारदाराकडून यापूर्वी घेण्यात आली होती, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली. 26 मे रोजी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तक्रारदार आणि खिरोळकर, त्रिभुवन यांच्यात चर्चा होऊन पाच लाख रुपये सुरुवातीला आणि फाईल पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अठरा लाख रुपये देण्याचे ठरले होते.

Deputy Collector News Chhatrapati Sambhajinagar
Crime News : पोलीसांनी सुपारी घेऊन माझ्या भावाचा एन्काऊंटर केला!

त्यानुसार 27 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर दीपक त्रिभुवन याने तक्रारदार यांच्याकडून पाच लाख रुपये स्वीकारले. ही रक्कम स्वीकारताच दुसऱ्या एका पथकाने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खेडकर यांना ताब्यात घेतले त्यानंतर खेडकर यांच्या घराच्या झडतीत या पथकाच्या हाती मोठे घबाड लागल्याने एकच खळबळ उडाली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com