Beed Crime News : विहिरीच्या मंजूरीसाठी वीस हजाराची लाच ; दहा हजार घेताना सरपंचावर एसीबीचा ट्रॅप!

The Anti-Corruption Bureau has arrested a sarpanch in Beed for allegedly demanding a bribe of ₹20,000 to approve a well. : गावचे सरपंच रुख्मानंद खेत्रे यांनी तुला विहीर मंजूर करून देतो, असे सांगून, गावच्या यादीत नाव टाकण्यासाठी आणि मंजुरीसाठी संबंधित इंजिनिअर व मॅडम यांच्यासाठी 20 हजाराची लाच मागितली.
Beed  ACB Action News
Beed ACB Action NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसिंचन विहिरीच्या प्रस्तावाला मंजूरीसाठी वीस हजाराची लाच मागणाऱ्या सरपंचाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बीड जिल्ह्यात माजलगावं तालुक्यातील किट्टी आडगावमधील हा प्रकार असल्याचे समोर आले आहे. मागितलेल्या वीस हजारापैकी दहा हजार रूपये स्वीकारताना सरपंच रुक्मानंद खेत्रे याने तक्रारदाराच्या आईच्या नावाने मंजूर झालेली विहीर अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी आणि विहिरीच्या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती.

माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील एका शेतकऱ्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सरकारी अनुदानावर विहीर मिळावी, यासाठी आपल्या आईच्या नावे प्रस्ताव दिला होता. (Beed News) दरम्यान, गावचे सरपंच रुख्मानंद खेत्रे यांनी तुला विहीर मंजूर करून देतो, असे सांगून, गावच्या यादीत नाव टाकण्यासाठी आणि मंजुरीसाठी संबंधित इंजिनिअर व मॅडम यांच्यासाठी प्रत्येकी 10 हजार रूपये असे एकूण 20 हजाराची लाच मागितली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (anti corruption bureau) तक्रार दाखल केली. त्यानंतर पडताळणी करून शुक्रवारी दुपारी माजलगाव येथील गजानननगर भागात सरपंच खेत्रे यांच्या राहत्या घरी सापळा रचण्यात आला. या वेळी 20 हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपयांची लाच घेताना खेत्रे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, समाधान कवडे, उपनिरीक्षक सुरेश सांगळे, मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अमोल खरसाळे, संतोष राठोड आणि प्रदीप सुरवसे यांनी केली आहे.

Beed  ACB Action News
Anti Corruption News : रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने अन् बरचं काही; आरडीसी खिरोळकरच्या घरात सापडले घबाड!

व्याजाच्या पैशासाठी अपहरण

बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये उसने दिलेले पैसे आणि त्यावरील व्याज अशा एकूण 80 हजार रूपयाच्या वसुलीसाठी एका तरुणाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. मुलाच्या घरी फोन करत मुलगा जिवंत पाहिजे असेल तर आताच्या आता पन्नास हजार रुपये टाका, नाहीतर तो तुम्हाला दिसणार नाही, अशी धमकी अपहरण केलेल्या चार आरोपींनी दिली होती. धारूर पोलिसांनी अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली असून दोन जण फरार आहेत.

Beed  ACB Action News
Beed Bribe News : लाच सहाय्यकाने स्वीकारली अन् ठसका माजलगावच्या एसडीओंना लागला; ACB च्या सापळ्यात...

कृष्णा मैंद असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृष्णा मैंद याने धनराज चाटे, पृथ्वीराज राग व परमेश्वर आगाव यांच्याकडून पैसे उसने घेतले होते. त्याचे व्याज न दिल्याचे कारण सांगत या तिघांसह अन्य एकाने कृष्णाचे अपहरण केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com