औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेमध्ये शिवसेनेची (ShivSena) सत्ता आहे. या भागाचा विकास शिवसेनेला करता आलेला नाही. पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली शिवसेना अपयश लपविण्याचा प्रयत्न करित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आजी-माजी-भावी च्या गप्पा मारून जनतेची दिशाभुल केली आहे. मराठवाड्याचा विकास करण्यासाठी नंदनवन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी काही दिवसात ब्ल्यु प्रिंट जारी करणार असल्याची माहिती, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (MNS district president Suhas Dashrathe criticizes ShivSena)
मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेसह, सुहास दाशरथे यांच्यासह सतनाम सिंग गुलाटी, गजन गौडा पाटील, संदिप कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेत सुहास दाशरथे यांनी पाणी पुरवठा योजनेबाबत मनसेने उचलेल्या प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. यामुळे गाजर आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत घोषणाच केलेल्या आहे. त्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी काहीच केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
१९८८ पासून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पुर्वी लोकांना दररोज पाणी मिळत होते. आता तेही मिळत नाही. रस्त्याचा प्रश्न, खाम नदीचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, याशिवाय नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यात अपयश ठरले आहे. या पक्षांच्या काळातच शहरात जिल्हयात टँकर लॉबी तयार झाल्याचा आरोप त्यांनी केला. १७ सप्टेंबरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आजी–माजी–भावी असा उल्लेख केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भावी शब्दामुळे भाजपलाही सत्तेचे डोहाळे लागल्याचा आरोप सुहास दाशरथे यांनी केला.
मराठवाड्याचा नंदनवन करण्याचा मनसेचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी शहर व मराठवाड्याची ब्ल्यु प्रिंट तयार करण्यात येणार आहे. या प्रिंटच्या माध्यमातुन शहराचा विकास कसा होईल? हे दाखविण्यात येणार आहे. अशीही घोषणा करून मनसेकडून महापालिकेची तयारी सुरू झाल्याची संकेतही सुहास दाशरथे यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.