MNS : `राज`सभेची मनसेकडून जय्यत तयारी ; घरोघरी जाऊन निमंत्रण..

मनसे सभेच्या ठिकाणावर ठाम आहे, तर सभेला परवानगी द्यायची की नाही ? यावर पोलिसांचा सध्या खल सुरू आहे. (MNS)
MNS Chief Raj Thackeray
MNS Chief Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी औरंगाबादेत होणाऱ्या जाहीर सभेची मनसेकडून (MNS) जय्यत तयारी सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी राज सभेचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत, तर घरोघरी जाऊन, रॅली काढत या सभेचे निमंत्रण नागरिक, व्यापारी, उद्योजकांना दिले जात आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत १ मे रोजीच्या सभेची घोषणा केली होती. यासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ देखील आरक्षित करण्यात आले आहे. (Aurangabad)

पोलिसांच्या परवानगीसाठी मनसेच्या वतीने अर्ज देण्यात आला असला तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. पोलिसांनी सभेची तारीख आणि स्थळ बदलण्याची पोलिसांची विनंती देखील धुडकावून लावली आहे. गरज पडल्यास परवानगीसाठी कोर्टात जाण्याची देखील आपली तयारी असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे. अद्याप पोलिसांची सभेला परवानगी नाही, पण मनसेचे पदाधिकारी मात्र या सभेसाठी कंबर कसून आहेत.

घरोघरी जाऊन निमंत्रण पत्रिका दिल्या जात आहेत. रॅली काढून व्यापारी, व्यावयासिक, कामगार, रिक्षाचालक, भाजी विक्रेते अशा सर्वच लोकांना मनसेकडून राजसभेची निमंत्रण पत्रिका दिली जात आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील ही सभा ऐतिहासिक करण्यासाठी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मुंबईतून तशा सूचना देण्यात आल्या असून नुकतीच मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली होती.

MNS Chief Raj Thackeray
Rupali Chakankar : `महिला आयोग आपल्या दारी`, २६ रोजी औरंगाबादेत जनसुनावणी

मनसे सभेच्या ठिकाणावर ठाम आहे, तर सभेला परवानगी द्यायची की नाही ? यावर पोलिसांचा सध्या खल सुरू आहे. पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता हे मुबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून अद्याप तरी सभेच्या परवानगी बाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याचे समजते. सभेला फक्त सात दिवसांचा कालावधी आहे, त्यामुळे मनसेकडून या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या एक दोन दिवसांत सभेच्या परवानगी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com