Mock Drill News : राज्याची पर्यटन अन् मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात होणार माॅक ड्रील!

A mock drill will be conducted in Chhatrapati Sambhajinagar, a city of historical, religious, and industrial significance. : महाराष्ट्रातील सोळा ठिकाणांची यासाठी निवड करण्यात आली असून त्यात छत्रपती संभाजीनगर शहराचाही समावेश आहे.
Chhatrapati Sambhajinagar Mock Drill News
Chhatrapati Sambhajinagar Mock Drill NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्याने संपूर्ण देश हादरला. दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा, अशी मागणी देशभरातून होऊ लागली आहे. केंद्रातील भाजपा एनडीए सरकारनेही पाकिस्तानला आता माफी नाही, म्हणत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याचे ठरवले आहे. सीमेवर भारतीय सैन्याची युद्ध सज्जता पाहता काहीतरी मोठं होणार याची कल्पना देशवासियांना आली आहे.

त्यातच उद्या (ता.7) महाराष्ट्रासह देशभरात आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी याचा सरावर म्हणून माॅक ड्रील करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सोळा ठिकाणांची यासाठी निवड करण्यात आली असून त्यात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराचाही समावेश आहे. संभाजीनगरची निवड करण्यामागे या शहराचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, औद्योगिक महत्व पाहता करण्यात आल्याचे दिसते. आशिया खंडातील सर्वाधिक झपाटाने वाढणारे औद्योगिक शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख केला जातो.

जागतिक वारसा ठरलेल्या वेरुळ-अजिंठा लेण्या, बिबी का मकबरा, पाणचक्की, अजिक्य देवगिरी किल्ला आणि औरंगजेबाची कबर याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. 52 दरवाजांचे शहर अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरला निझाम राजवटीचा काळाकुट्ट इतिहास देखील आहे. (Marathwada) देशातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेला जायकवाडी डॅम हा याच संभाजीनगर शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोचणारे रेल्वेचे जाळे, आंतरराष्ट्रीय विमानतळ, शेंद्रा-बिडकीन सारखी पंचतारांकित एमआयडीसी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल काॅरिडोअर, आॅरिक सिटी यासारखे मोठे इंडस्ट्रीयल हब हे या शहराचे वैशिष्ट आहे.

Chhatrapati Sambhajinagar Mock Drill News
Mock Drill in Maharashtra : आत्ताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉक ड्रील; वाचा संपूर्ण यादी...

धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध..

उद्योग आणि आॅटोमोबाईल इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरात धार्मिक पर्यटनालाही मोठे महत्व आहे. देशातील बारा ज्योतीर्लिंगापैकी एक असे घृ्ष्णेश्वर वेरूळ हे संभाजीनगरपासून अवघ्या 27 किलोमीटर अंतरावर आहे. धार्मिक पर्यटनासह जागतिक वारसा असलेल्या अजिंठा-वेरूळ, औरंगाबाद लेण्या पहाण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी या शहरात येतात.

Chhatrapati Sambhajinagar Mock Drill News
India Vs Pakistan : 1971 नंतर देशात पहिल्यांदाच मॉक ड्रील; कसे असणार? काय-काय होणार? जाणून घ्या A to Z गोष्टी

देवगिरी किल्ल्यावरील चढाई हा पर्यटकांसाठी एक वेगळा अनुभव असतो. राज्याच्या आर्थिक विकासात पर्यटन, उद्योगाच्या माध्यमातून संभाजीनगरचेही मोठे योगदान आहे. शहरालगतच्या लष्कराच्या ताब्यातील परिसराचा कारभार पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर छावणी मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) ही संस्था इथे अस्तित्वात आहे.

हवाई वाहतूक

छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चिकलठाणा येथे आहे. येथून हैदराबाद, दिल्ली, उदैपूर, मुंबई, जयपूर, पुणे आणि नागपूर साठी विमान सेवा उपलब्ध आहे. 2008 पासून हज्ज यात्रेसाठी विमान सेवा उपलब्ध झाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Mock Drill News
Chhatrapati Sambhajinagar Water Issue : शहराशी जिव्हाळा नसलेल्या बाहेरच्या पालकमंत्र्यांनीही पाणी प्रश्नाकडे केले दुर्लक्ष!

रेल्वे वाहतूक

छत्रपती संभाजीनगर हे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सिकंदराबाद-मनमाड ब्रॉ़डगेज लोहमार्गावर असलेले रेल्वे-स्थानक आहे. छत्रपती संभाजीनगर पासून नांदेड, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, शिर्डी, नागपूर, नाशिक, पुणे, अमृतसर, अंबाला, निझामाबाद, कुर्नुल, रेनिगुंटा, विशाखापट्टनम्, इरोडे, मदुराई, भोपाळ, ग्वालियर, वडोदरा, चेन्नई, तिरुपती, रामेश्वरम , अहमदाबाद आणि राजकोटपर्यंत रेल्वे-सेवा उपलब्ध आहे.

Chhatrapati Sambhajinagar Mock Drill News
Mock Drill in Maharashtra: नैसर्गिक बंदर अन् जलमार्गासाठी मुंबई अन् ठाण्याचे असे आहे लष्करी महत्त्व

शहराचा इतिहास

इतिहासकारांच्या मते 1604 मध्ये अहिल्यानगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहपूर ठेवले होते. 1634 मध्ये औरंगजेब ह्या (खडकी/फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. 1644 मध्ये तो आग्ऱ्याला परत गेला. त्यानंतर 1681 मध्ये मराठा साम्राज्याचा बिमोड् करण्यासाठी औरंगजेब पुन्हा ह्या शहरात आला.

Chhatrapati Sambhajinagar Mock Drill News
Omar Abdullah Meets PM Modi : भारत पाकविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच ओमर अब्दुल्ला यांनी घेतली PM मोदींची भेट, नेमकी चर्चा काय?

1707 मध्ये औरंगजेब याचे अहमदनगर येथे निधन झाले. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद तालुक्यात औरंगजेब याची कबर आहे. 1707 नंतर औरंगाबादचा ताबा हैदराबादच्या निझाम राजवटीकडे गेला. हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर मराठवाड्यासह औरंगाबाद शहर ही भाषिक आधारावर महाराष्ट्राशी जोडण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1 मे, 1960 मध्ये झाली. त्या दिवशीपासून औरंगाबाद महाराष्ट्राचा भाग बनले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com