India Vs Pakistan : 1971 नंतर देशात पहिल्यांदाच मॉक ड्रील; कसे असणार? काय-काय होणार? जाणून घ्या A to Z गोष्टी

Mock Drill Advisory : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध प्रचंड तणावाचे झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.
Prime Minister Narendra Modi chairs a high-level security meeting post-Pahalgam attack with Defence Minister Rajnath Singh, NSA Ajit Doval, and chiefs of Army, Navy, and Air Force in attendance.
Prime Minister Narendra Modi chairs a high-level security meeting post-Pahalgam attack with Defence Minister Rajnath Singh, NSA Ajit Doval, and chiefs of Army, Navy, and Air Force in attendance.sarkarnama
Published on
Updated on

Mock Drill Advisory : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध प्रचंड तणावाचे झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना मॉक ड्रील करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने उद्या (7 मे) रोजी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मॉक करण्यास सांगितले आहे. राज्यांना हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी मॉक ड्रीलचे निर्देश दिले गेले आहेत.

काय असते मॉक ड्रील?

नागरी संरक्षण नियम, 1968 प्रमाणे, देशातील 244 जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रील पार पडणार आहे. युद्ध परिस्थितीमध्ये हवाई हल्ला झाल्यास देशातील जनता कितपत वेगाने स्वतःचा बचाव करू शकते, किती प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकते,हे जाणून घेण्याचा आणि लोकांमधील भीती कमी करणे आणि जीव वाचवण्याचे प्रशिक्षण देणे हे मॉक ड्रीलचा मुख्य उद्देश आहे.

Prime Minister Narendra Modi chairs a high-level security meeting post-Pahalgam attack with Defence Minister Rajnath Singh, NSA Ajit Doval, and chiefs of Army, Navy, and Air Force in attendance.
India Vs Pakistan War: आधीच बिथरलेल्या पाकिस्तानला नवा मोठा धक्का; 'हा' जुना बलाढ्य मित्र भारताच्या मदतीला धावून आला

मॉक ड्रीलदरम्यान, युद्ध सदृश्य परिस्थिती तयार केली जाईल. यात हवाई हल्ल्यावेळी वाजतात तसे सायरन वाजवले जातील, अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित करून ब्लॅक आऊट केले जाईल. जवळच्या आश्रयस्थळी जाण्याचा, आणीबाणीच्या स्थितीमध्ये जलद प्रतिसाद देण्याचा सराव घेतला जाईल.

या मॉक ड्रिलमध्ये स्थानिक प्रशासन, पोलीस, होमगार्ड्स, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस) आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्कराची जबाबदारी नाही. सामान्य नागरिकांना युद्धस्थितीमध्ये काय करावे, केव्हा करावे आणि संयम कसा राखावा हे लक्षात आल्यास संपूर्ण राष्ट्राची ताकद वाढते, हे यातून समजावून सांगितले जाणार आहे.

Prime Minister Narendra Modi chairs a high-level security meeting post-Pahalgam attack with Defence Minister Rajnath Singh, NSA Ajit Doval, and chiefs of Army, Navy, and Air Force in attendance.
India Pakistan Tension : मोठी बातमी! पाकिस्तानसोबत तणाव अन् केंद्राचे राज्यांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिमहत्त्वाचे निर्देश

हवाई हल्ल्याच्या बाबतीत सामान्य जनतेला माहिती मिळावी म्हणून संवेदनशील भागात आणि संस्थांमध्ये सायरनची चाचणी केली जाईल. लोकांना ड्रॉप-अँड-कव्हर, जवळील आश्रयस्थान शोधणे, प्रथमोपचार आणि मानसिक व्यवस्थापन याबद्दल शिकवण्यासाठी शाळा, कार्यालये आणि सामुदायिक केंद्रांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जातील.

याशिवाय, रात्रीच्या वेळी हवाई हल्ला झाल्यास शहराला शत्रूच्या नजरेपासून लपवता यावे म्हणून अचानक वीज बंद केली जाईल. 1971 च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान अशा प्रकराचा मॉक ड्रील घेण्यात आला होता. उपग्रह किंवा हवाई देखरेखीपासून बचाव करण्यासाठी लष्करी तळ, दळणवळण टॉवर आणि वीज प्रकल्प यासारख्या मोक्याच्या इमारतींना कव्हर केले जाईल. युद्ध परिस्थितीमध्ये उद्भवू शकणाऱ्या अडचणी ओळखता याव्यात म्हणून उच्च-जोखीम असलेल्या भागातून सुरक्षित भागात स्थलांतर होण्याचा सराव केला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com