

Prakash Ambedkar: या जगात दोन विश्वगुरू आहेत. एक खरा, दुसरा खोटा. पण सध्या या दोन विश्वगुरूंच्या इगोमुळे आपल्या देशावर युद्धाचे सावट आहे. सगळे ज्योतीषी सागंत आहे, की पुढील सहा महिन्याचा काळ हा देशासाठी कठीण असणार आहे. हे युद्ध टाळायचे असेल तर मतदानाच्या रुपातून आपणच मोदीचं कबरंड मोडू, जेणेकरून युद्धाला आपल्याला सामोरे जावे लागणार नाही, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली. मुस्लिम समाजावर अन्याय, अत्याचार होत असताना इथे मुफ्ती, मौलवी आणि ज्यांना निवडून दिले ते रस्त्यावर का उतरले नाही? असा सवालही आंबेडकरांनी केला.
आंबेडकर पुढे म्हणाले, या शहारचे अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा, रस्त्याचा, गटारांचा प्रश्न आहे. महापालिकेची निवडणूक जरी असली तरी याचं वेगळ महत्व आहे हे लक्षात ठेवा. महिनाभरापुर्वी आर्मीचे जे प्रमुख आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलं. पत्रकारांसमोर नजीकच्या काळात आपल्याला युध्दाला तोंड द्यावं लागणार आहे. हे तोंड का द्यावं लागणार आहे. भारतात जन्माला आलेल्या विश्वगुरुमुळे ही वेळ येणार आहे. या विश्वगुरूचं आणि खऱ्या विश्वगुरूचा इगो जो आहे तो एकमेकांना धडकतो आहे. आपला विश्वगुरू नकली, खरा ट्रम्प. अमेरिकेने नवा कायदा केला, भारतातून जो माल अमेरिकेत जातो, त्यावर पाचशे टक्के टॅक्स लावला.
म्हणजे दोन रुपयांची वस्तू शंभर रुपयावर जाणार. मग अमेरिकते ती कोणी विकत घेईल का? या वस्तुच्या विक्रीतून जे डॉलर मिळत होते ते आता बंद होणार आहेत. एका डॉलरची किमंत 90 रुपये आहे ती आता 130 रुपायाला होणार आहे. भारतात महागाई वाढेल, तुमचा पगार वाढणार आहे का? तुमची मजुरी वाढणार आहे का? नाही तर मग जेवढं आहे त्यात भागवावं लागेल. म्हणजे चार गोष्टी सोडून द्याव्या लागतील. आता हे कोणामुळे तर, त्या चायवालामुळं असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
सनातन हिंदूंना माझे आव्हान आहे, आपले भांडण सुरू राहील पण मोदींनी हे संकट ओढावून घेतलं ते दूर करायचं की नाही हे ठरवावं लागेल. नुसती महागाई वाढणार नाही, तर ट्रम्पने शेजारच्या राष्ट्रांना रातोरात गायब करायला सुरूवात केली आहे. ट्रम्पला आम्हीही सांगतो मोदींना गायब कर. ट्रम्प म्हणतो, याचं मला कंबरडं मोडायचं आहे. म्हणून पाकिस्तानला शस्त्र दिली जातायेत. माझा सनातनवादी हिंदुत्ववाद्यांना आवाहन करतो, तुमच्याकडे सत्ता आहे. ट्रम्पला मोदीचं कबरंड मोडायचं, त्याआधी आपण दोघ मिळून मोदीचं कंबरड मोडू.
तुम्ही तुमच्या पक्षाला मत देऊ नका, बलात्कार, लैंगिक अत्याचार करणारा भाजपचा स्वीकृत सदस्य झाला. त्याचा आम्हाला त्रास नाही, तो उद्या कोणाच्या घरी येईल. भाजप, आरएसएसच्या कार्यकर्त्यांच्या घरी तो येईल. त्यामुळे असुरक्षित तुम्ही व्हाल, आम्ही नाही. तुम्हाला सुरक्षित करायचं असेल आणि ट्रम्पला सांगायचं असेल तर आम्ही मोदीला मतदान देत नाही, हे सांगावं लागेल. तुला युद्ध करण्याची गरज नाही. अन् युद्ध झालं की काय होईल? औरंगाबादमध्ये काय आहे? मुंबईच्या रस्त्यावर जातांना आपण बघतो काय आहे? मिलटरी, छावणी युद्धात यालाच टार्गेट केलं जातं.
महागाई आपण थांबवू शकतो, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो. भारतासाठी पुढील सहा महिन्याचा काळा वाईट असेल असं ज्योतिषी सांगतात. मोदीला हटवलं तर परिस्थिती बदलेल. मौलवी-मुफ्तीना माझं आव्हान आहे. औरंगजेबचा विषय झाला, हिजाबचा विषय झाला इथला एक तरी नगरसेवक मुस्लिम समाजाच्या बाजूने उभा राहिला का? मुसलमानांवर अत्याचार झाला, घरावर बुलडोझर फिरले, कोणी इथे मोर्चे काढले का? मग आज मौलवी आणि मुफ्ती, संघटना काही भूमिका घेत नाहीत. जो जिंकणार त्यांच्या बाजूने मुस्लिम समाज असला पाहिजे, असं सांगितलं जात होतं. म्हणून ते काँग्रेसच्या नादी, औरंगाबादमध्ये एमआयएमच्या नादी लागले.
दोन दिवसापुर्वी काय नाटंक झालं, त्यावर मी बोलत नाही. मित्र जोडायला शिका असं माझं आवाहन मुफ्ती, मौलवीनां आहे. तरच तुम्ही बीजेपी, आरएसएसला तोंड देऊ शकता. समाजाने तरी काही भूमिका घेतली पाहिजे. औरंगाबादेत टिपू सुलतान, औरंगजेबच स्टेट्स ठेवलं म्हणून शंभर पोरांवर पोलीसांनी कारवाई सुरू केली होती. तुम्ही मित्र जोडले तर एक ताकद उभी राहते. ही लढाई आहे, आपली ताकद हरली तर पहिला निशाणा मुस्लिम समाज आहे. ज्यांना निवडून दिले ते मुस्लिम समाजावर अत्याचार झाले तेव्हा ते रस्त्यावर का उतरले नाही? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीसोबत येण्याचे आवाहन त्यांनी मुस्लिम समाजाला केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.