Mothers Day News : 'देवाने वरदान दिले तर जन्मोजन्मी अशी आई...' ; ओमराज निंबाळकरांची कृतज्ञता!

Dharashi MP Omraje Nimbalkar News : तेरे नाम से शुरू, तेरे नाम पे खतम, ओमराज निंबाळकरांची कृतज्ञता आईसाठी कृतज्ञता...
Mothers Day News
Mothers Day NewsSarkarnama

Dharashiv News : माणसाचं पहिलं प्रेम आईच असते. पितृछत्र अचनाक हिरावल्यानंतर खंबीरपणे कुटुंबांच्या पाठीशी उभं राहून ते सावरण्याची ताकद माझ्या आईमध्ये आहे. आज मी राजकारणात असलो तरी कुठलाही मोठा निर्णय आईला विचारल्याशिवाय घेत नाही, अशा शब्दात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मातृदिना निमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. (Lok Sabha Election 2024)

आईचे आशिर्वाद घेताना फोटो ओमराजेंनी पोस्ट केला आहे. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना 'तेरे नाम से शुरू, तेरे नाम पे खतम,' या गीताच्या ओळी टाकून आई हेच माझे सर्वस्व असल्याचे ओमराजे म्हणाले. माणसाचं पहिलं प्रेम हे आईच असते. पितृछत्र अचानक हिरवल्याने आमच्यावर आलेले संकट आईने पूर्ण ताकदीने परतवून लावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mothers Day News
Dharashiv Loksabha : मतदानादिवशीच धाराशिव लोकसभा मतदारसंघ हादरला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या

राजे साहेबांच्या जाण्याने आईने आईचे प्रेम आणि वडिलांची जवाबदारी या दोन्ही भूमिकेला न्याय दिला. एवढ्या कमी वयात कुंकू पुसले गेले तरी तिचे दुःख तिने बाजूला सारून आमच्या परिवाराची घडी बसवली. ती स्वतः 7 वी पर्यंत शिकली तरी शिक्षणाचे महत्व जाणून तिने माझ्या 2 भावंडाना डॉक्टर बनवून दाखवले. मला कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर आजही आईचा सल्ला हा मोलाचा ठरतो.

केवळ आईमुळेच आमच्या घराला घरपण आणि शोभा आहे. देवाने जर एक वरदान माग असे सांगितले तर जन्मोजन्मी अशा आई वडिलांच्या पोटी जन्म मिळो, एवढेच मागणे राहील. माझ्या जीवनाचा सारांश सांगायचे झाल्यास आईच्या नावाने सुरू आणि आईच्या नावानेच संपन्न असे सांगता येईल. आईला आज मातृदिन निमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देतांनाच सर्वांनी आज आवर्जून तुमचा आणि आईचा एकत्र फोटो टाका, असे आवाहन ओमराजे यांनी केले.

Mothers Day News
Dharashiv Loksabha Constituency : प्रामाणिक माणसाला मत देणार की संधीसाधू ? ओमराजे यांचा सवाल..

ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचा राजकीय प्रवास हा संघर्षमय राहिलेला आहे. वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर राजकारणात आलेले ओमराजे आमदार, खासदार झाले. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून पक्षाने त्यांना निष्ठेचे फळ आणि पाच वर्षात मतदारसंघातील लोकांचा मिळालेला प्रचंड पाठिंबा पाहता दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली.

Mothers Day News
Dharashiv Loksabha : मतदानादिवशीच धाराशिव लोकसभा मतदारसंघ हादरला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या
Mothers Day News
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

महायुतीच्या अर्चना पाटील विरुद्ध ठाकरे गट महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) ओमराजे निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली. 7 मे रोजी धाराशिव मतदारसंघासाठी 62 टक्के एवढे मतदान झाले. मतदानाला जाण्यापुर्वी ओमराजे यांनी आपले वडील दिवंगत पवनराजे निंबाळकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले होते. आज मातृदिना निमित्त आईचे आशिर्वाद घेत त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com