Dharashiv Loksabha : मतदानादिवशीच धाराशिव लोकसभा मतदारसंघ हादरला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या

Loksabha Election 2024 Voting : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील पाटसांगवी (ता. भूम) येथे मतदान सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याचा भोसकून खून करण्यात आला आहे.
Baramati Mahavitaran crime News
Baramati Mahavitaran crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील पाटसांगवी (ता. भूम) या गावात मतदानाच्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास एकाचा भोसकून खून करण्यात आला. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात असून, खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव समाधान पाटील असे आहे. ते ठाकरे गटाचे असल्याचे सांगितले जात आहे. खुनाचे कारण वैयक्तिक की राजकीय हेही स्पष्ट झाले नव्हते.

भोसकणारा आणि ज्याचा खून झाला ते नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. पाटसांगवी येथील मतदान केंद्राजवळ शिंदे गटाच्या 20 ते 22 कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर चाकूने हल्ला केला. त्यात समाधान पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ठाकरे गटाचे अन्य तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्या सर्वांना बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Baramati Mahavitaran crime News
Madha Lok Sabha News : उद्धव ठाकरेंचे जिल्हा संपर्क प्रमुख गोविंद बागेत, गोरे कोणाला मदत करणार?

तेथे डॉक्टरांनी समाधान पाटील यांना मृत घोषित केले. अन्य कार्यकर्त्यांवर उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर गावात तणाव निर्माण झाला. काहीवेळ मतदानाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा मोठ्या संख्येने दाखल झाला. त्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले. हल्लेखोर फरार झाल्याचे सांगितले जात आहे.

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत होत आहे. भूम, परंडा तालुक्यांत महायुतीच्या प्रचाराची जबाबदारी प्रामुख्याने पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि शिवसेना शिंदे गटाचे दत्ताअण्णा साळुंके यांच्यावर सोपवण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आदींनी सांभाळली. या मतदारसंघात हाय होल्टेज लढत असतानाही प्रचारादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पाटसांगवी येथील खुनाच्या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले समाधान पाटील हे अन्य काही कार्यकर्त्यांसह उभे होते. त्यावेळी तेथे शिंदे गटाचे 20 ते 22 कार्यकर्ते आले. त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून बाचाबाची सुरू झाली. त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या मारहाणीत चाकूचा वापर केला. समाधान पाटील यांना एकाने चाकून भोसकले. ते रक्तबंबाळ होऊन खाली पडले. त्यांच्यासोबतच अन्य तीन ते चार कार्यकर्तेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Baramati Mahavitaran crime News
Thane Lok Sabha Election : ठाण्यात शिवसेनेचे दोन्ही गट अस्तित्वासाठी भिडणार; बाण चालणार की मशाल पेटणार?

हल्लेखोर फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पंचनामा करण्यात आला असून, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जखमींना दाखल करण्यात आलेली बार्शी येथील रुग्णालयात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट दिली. मृताच्या नातेवाईकांचे सांत्वन करून त्यांनी जखमींची विचारपूस केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Baramati Mahavitaran crime News
Sunil Shelke News: "पवार 'रामकृष्ण हरी वाजवा तुतारी' म्हणतात, पण दुसरीकडे दोन हजार टन मटणाच्या...", शेळकेंचा गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com