Phaltan Maratha Protest : तोपर्यंत मतदान करणार नाही : फलटण मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

Phaltan Maratha येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे पायी जाऊन चक्का जाम आंदोलनास सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रारंभ केला.
Phaltan Maratha Protest
Phaltan Maratha Protestsarkarnama

-किरण बोळे

Phaltan Maratha Reservation Protest : अंतरवाली सराटी (ता. अंबड जि. जालना) येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज फलटण येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे तब्बल दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी फलटणकरांनीही शंभर टक्के दुकाने बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. यावेळी आम्ही शपथ घेतो कीओबीसीतुन टिकणारे आरक्षण मिळत नाही तोवर कुठल्याही निवडणुकीत मतदान करणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांबाबत Maratha Protest घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटल्या होत्या. या घटनेच्या निषेधार्थ फलटणला Phaltan आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास मराठा समाज बांधवांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करुन शपथ घेतली. यानंतर सर्व समाज बांधवांनी तेथुन क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे पायी जात चक्का जाम आंदोलनास प्रारंभ केला.

यावेळी आंदोलकांनी चौकामध्ये चारही बाजुने ठिय्या मांडून वर्दळीच्या चौकातील वाहतुक रोखून धरली. मराठा आंदोलकांवर झालेल्या अन्यायाबाबत निषेध व्यक्त करुन परखड भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सर्व पक्ष व पक्ष प्रमुखांच्या मर्यादा आता स्पष्ट झाल्या आहेत. हे सर्वजण मराठा समाजाला आरक्षण देण्यात नालायक ठरले आहेत.

मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असला तरी संघर्ष आमच्या ठायी ठायी हे शासनाने विसरु नये. ओबीसी कोट्यातुन आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. लोकशाही व शांततेच्या व सनदशीर मार्गाने आंदोलने करुनही सरकारला जाग कशी येत नाही ? आम्हाला आमचा हक्क हवाय. जर मराठ्यांचे नेते जाणते असते तर आज समाजाला रस्त्यावर बसण्याची वेळ आली नसती.

Phaltan Maratha Protest
Satara Maratha Protest : सातारा जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; कराडला कडकडीत बंद

लोकप्रतिनिधींनो मराठ्यांना आरक्षणासाठी तुम्ही घरात बसुन उंबरठा ओलांडणार नसेल तर पुढिल काळात तुम्हाला तुमची जागा समाज दाखविल्याशिवाय राहणार नाही. आता आणखी अंत पाहू नका, आमचं ठरलयं, आरक्षणाच जमत नसेल तर घरात बसा, असे इशारे आंदोलकांनी बोलताना दिले. यानंतर सर्व आंदोलकांनी ओबीसीतुन टिकणारे आरक्षण मिळत नाही तोवर कुठल्याही निवडणूकीत मतदान करणार नाही अशी शपथ घेतली.

प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन देण्यात आल्यानंतर शांततापुर्ण सुरु असलेल्या आंदोलनाची सांगता करण्यात आली. दरम्यान, आजच्या चक्का जाम आंदोलनाचे प्रमुख केंद्र क्रांतीसिंह नाना पाटील चौक होते. परंतू, काही आंदोलकांनी गनिमी काव्याने शहरातील अनेक चौकांमध्ये ठिया मांडला. त्यामुळे तेथील वाहतुक जागेवरच थांबली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील सर्व व्यापारी यांनी दुकाने बंद ठेवल्याने फलटण शहर शंभर टक्के बंद राहिले.

Edited By Umesh Bambare

Phaltan Maratha Protest
Maratha Reservation News : आरक्षणावर तोडगा निघणार ? बैठकीला मुख्यमंत्र्यांकडून जरांगेना निमंत्रण ; कुणबी दाखला मिळणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com