Bajrang Sonawane On Police News : 'तू प्रेस घेच'!, बजरंगबाप्पांचे 'त्या' पोलिस अधिकाऱ्याला चॅलेंज

MP Bajrang Sonawane challenges that police officer : बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाचे प्रियांश काणूनगो यांची भेट घेत या प्रकरणात स्वतंत्र तपास करावा. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे, दहिफळे या सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, अशी मागणी केली होती.
Bajrang Sonwane, ganesh munde
Bajrang Sonwane, ganesh mundeSarkarnama
Published on
Updated on

बीड : 'मी प्रेस घेतली तर या खासदाराची चड्डी जागेवर राहाणार नाही', अशी धमकी देणारी पोस्ट टाकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला आता खासदार (Bajrang Sonawane) बजरंग सोनवणे यांनी खुले आव्हान दिले आहे. 'तूला माझी विनंती आहे, तू एकदा प्रेस घेच' अशा शब्दात बजरंगबाप्पांनी त्या पोलिस अधिकाऱ्याला खुले चॅलेंज दिले आहे.

पुणे येथील आक्रोश मोर्चात बोलताना बजरंग सोनवणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्या पोस्टचा उल्लेख केला. (Beed News) काल एक अधिकारी म्हणाला, की जर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझी चड्डी राहणार नाही, माझी विनम्र विनंती आहे की तू एकदा प्रेस घेच, तुला विविध ठिकाणी पोस्टिंग कोणाच्या मेहरबानी मिळाली आहे, हे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये समजून जाईल, असा इशारा बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणात दिला.

Bajrang Sonwane, ganesh munde
Beed News : जातीयवादी मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा; परळीत मुंडे समर्थकांचे पोलिस स्टेशनसमोर आंदोलन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडसह राज्यातील राजकीय वातवरण तापले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक पक्षाच्या नेते, लोकप्रतिनिधींनी केला आहे.

Bajrang Sonwane, ganesh munde
MP Bajrang Sonawane News : वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजित पवारांच्या ताफ्यात! खासदार बजरंग सोनवणे यांचा दावा

खासदार बजरंग सोनवणे यांनी तर हे प्रकरण थेट संसदेच्या अधिवेशनात नेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत कारवाईची मागणी केली होती. या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा आणि त्यांना पाठीशी घालू पाहणाऱ्या नेत्यांवर सोनवणे अक्षरशः तुटून पडले आहेत. अशातच बीडमधील पोलिसांवर त्यांनी संशय व्यक्त केला होता.

Bajrang Sonwane, ganesh munde
Santosh Deshmukh Case : देशमुखांची हत्या करून आरोपी थेट गुजरातमधील मंदिरात आश्रयाला, जवळचे पैसे संपल्यामुळे पोलिसांना लागला सुगावा

दोन दिवसापुर्वीच बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांश काणूनगो यांची भेट घेत या प्रकरणात स्वतंत्र तपास करावा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे, दहिफळे या दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर यापैकीच एक असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांनी बीडमधील पोलिसांच्या ग्रुपवर खासदार सोनवणे यांच्या संदर्भात व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट केली.

Bajrang Sonwane, ganesh munde
Manoj Jarange : 'मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्री साहेब आवरा; अन्यथा...': मनोज जरांगे यांचा कडव्या शब्दांत इशारा

'या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही, मी प्रेस घेतली तर' असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते. यावर खासदार कोण? असा प्रश्न या ग्रुपमधील काही पत्रकारांनी केला. मात्र, ते कळण्याआधीच मुंडेंना सदर ग्रुपमधून काढून टाकण्यात आले होते. पोस्टमध्ये थेट खासदार बजरंग सोनवणे यांचे नाव नसले तरी दोन दिवसापुर्वी त्यांनी मानवाधिकार आयोगाला दिलेल्या पत्रात सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांचे नाव होते. त्यामुळे मुंडेंचा रोख बजरंग सोनवणे यांच्यावरच होता, असे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com