MP Imtiaz Jaleel On Farmers: महिनाभरात ९९ शेतकऱ्यांनी जीवन संपवले, दुष्काळाकडे वाटचाल, तरीही सरकार बेफिकीर..

AIMIM News: वारंवार येणारे नैसर्गीक संकट, सरकारची उदासीनता आणि त्यामुळे कुटुंबाची सतावत असलेली चिंता.
MP Imtiaz Jaleel News
MP Imtiaz Jaleel NewsSarkarnama

Aurangabad Political News : यंदा अख्खा पावसाळा कोरडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः मराठवाड्यात भीषण दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Affected Farmers) ऑगस्ट २०२३ या एकाच महिन्यात मराठवाड्यातील तब्बल ९९ शेतकऱ्यांनी आपले जीवन या संकटामुळे संपवले आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या दुष्काळाकडे आपली वाटचाल सुरू असल्याची भिती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली आहे.

MP Imtiaz Jaleel News
Pankaja Munde Shivshakti Rally : पंकजा मुंडेंच्या यात्रेकडे भाजपची पाठ, पण सामान्यांची भक्कम साथ..

अशा चिंताजनक परिस्थितीमध्ये राज्य व केंद्रातील सरकार मात्र दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतले आहे, अशी टीकाही इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांनी केली आहे. मराठवाड्यात पावसाअभावी कापूस, सोयाबीन, फळबागा धोक्यात आल्या आहेत. (Aimim) पाऊस नाही, विहिरीत थोडेफार पाणी आहे, तर वीज नाही असा दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे.

दुसरीकडे गेल्यावेळी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची सरकारी मदत अजून मिळालेली नाही, कांद्याचे अनुदान, पीक कर्ज, पीकविमा या सगळ्याच प्रश्नांवर शेतकऱ्याला लढावे लागत आहे. (Marathwada) वारंवार येणारे नैसर्गीक संकट, सरकारची उदासीनता आणि त्यामुळे कुटुंबाची सतावत असलेली चिंता यातून ऑगस्ट महिन्यात ९९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी या संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ट्विटच्या माध्यमातून केला आहे. इम्तियाज आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, एकट्या ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात ९९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने मला भीती वाटते की आपण आतापर्यंतच्या सर्वात भीषण दुष्काळी परिस्थितीकडे वेगाने वाटचाल करत आहोत.

पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे, शेतकरी पीक गमावत आहेत, गुरांना पाणी नाही. परिस्थिती फक्त चिंताजनक आहे परंतु दुर्दैवाने केंद्र आणि राज्य सरकार गैर समस्यांमध्ये व्यस्त आहेत, अशी खंतही इम्तियाज यांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com