MP Omprakash Rajenimbalkar
MP Omprakash Rajenimbalkar Sarkarnama

MP Omprakash Rajenimbalkar : सलग दुसरा विजय मिळवून ओमराजे धाराशिवचा शिरस्ता मोडणार का?

Dharashiv Lok Sabha constituency News : धाराशिवमध्ये सलग दोन वेळा कुणालाही खासदार होता आले नाही...
Published on

Dharashiv Political News : धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या सन 2009 मध्ये झालेल्या पुनर्रचनेनंतर एकाही उमेदवाराला सलग दोन वेळा निवडून येता आलेले नाही. विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर दुसऱ्यांदा लोकसभेसाठी मैदानात असणार आहेत, त्यामुळे धाराशिवच हा प्रघात मोडीत काढणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राजेनिंबाळकरांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोणत्या पक्षाचा राहील, कोण राहील, हे अजूनही गुलदस्तात आहे. (Latest Marathi News)

MP Omprakash Rajenimbalkar
Sharad Pawar Group NCP : शरद पवार गटाचा कवितेतून भाजपला टोला; म्हणाले, 'शेंबडं पोर...'

मात्र, सध्या बदललेली राजकीय परिस्थिती पाहता, सामान्य मतदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना पुन्हा लोकसभेत पाठवणार की, नवीन चेहर्‍याला संधी देणार ? हे निकालानंतरच समोर येईल. 1952 मध्ये देशात पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली. या वेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा खुला प्रवर्गासाठी होता. लोकसभेच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या अनुक्रमे 1962, 1967 आणि 1971 मध्ये झालेल्या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तुळशीराम आबाजी पाटील हे लोकसभेत सलग तीन वेळा निवडून आले. (MP Omprakash Rajenimbalkar News)

MP Omprakash Rajenimbalkar
Ashok Chavan : फडणवीसांसमोरच 'आदर्श' घोटाळ्याबाबत चव्हाणांना प्रश्न; म्हणाले, "हा एक..."
MP Omprakash Rajenimbalkar
Om Rajenimbalkar: खासदार ओम राजेनिंबाळकरांच्या फिटनेसची चर्चा

त्यानंतर 1977 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर धाराशिव मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला. लोकसभेच्या आठव्या नवव्या आणि दहाव्या अनुक्रमे 1984, 1989 आणि 1991 मध्ये झालेल्या निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अरविंद तुळशीराम कांबळे सलग तीन वेळा निवडून आले. 1977 ते 2009 याकाळात धाराशिव लोकसभा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होता. 2009 नंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पुन्हा खुला झाला. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉ. पद्मसिंह पाटील, 2014 मध्ये शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड, तर 2019 मध्ये शिवसेनेचे ओमप्रकाश राजे निंबाळकर निवडून आले. (Latest Political News)

यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांची नावे मतदारांसमोर पर्याय म्हणून ठेवली आहेत. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून होत असलेल्या सर्वेक्षणानुसार कोणाला संधी मिळते, हे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे. मात्र, सद्यःस्थितीत महाविकास आघाडीतून ओमराजे निंबाळकर आणि त्यांना टक्कर देण्यासाठी महायुतीतील प्रवीणसिंह परदेशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश बिराजदार हे दोन पर्याय प्रयोग म्हणून आजमावले जात आहेत. दोघांबाबतही सामान्य मतदार आणि राजकीय जाणकारांतून येणार्‍या प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाच्या आहेत. परंतु त्यांच्या विजयाबाबत ठाम मत कुणाचेही होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंच्या उमेदवारासमोर सलग दुसर्‍यांदा विजयी होण्याचे आव्हान आहे. ओमराजे यांची मतदारसंघात लोकप्रियता असली तरी महाविकास आघाडीत पडलेली फूट आणि महायुतीची एकजूट पाहता त्यांना सलग दुसऱ्या विजयासाठी झटावे लागणार असे दिसते. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर सन 2009 मध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघ खुला झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तेंव्हाचे दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील विरुद्ध शिवसेनेचे रवींद्र गायकवाड, अशी लढत झाली. डॉ. पद्मसिंह पाटील विजयी झाले.

MP Omprakash Rajenimbalkar
NCP Politics : ब्लॅकमेलर, दीड शहाणा, मढ्यावरचं लोणी खाणारा; हफ्तेवसुली अन् बरंच काही...

त्यानंतरच्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा रवींद्र गायकवाड यांना झाला आणि पद्मसिंह पाटील यांचा दुसरा विजय हुकला. मागील निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांना डावलून विधानसभेत पराभूत झालेल्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना तानाजी सावंत यांच्या शिफारशीनुसार उमेदवारी बहाल करण्यात आली. त्यांच्यासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार राणा जगजितसिंह पाटील होते. शिवसेनेचे राजे विजयी झाले, राष्ट्रवादीच्या पाटलांना पराभव स्वीकारावा लागला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com