Nanded : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीची (Market Committee) निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत नांदेड बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील पुणेगांवकर, संचालक नागोराव पाटील, संचालक राम पाटील कदम, उपसरपंच दादाराव पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे या सर्वांनी सांगितले.
बाजार समिती निवडणुकीच्या रणधुमाळीतच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना हा धक्का असल्याचे बोलले जाते. नांदेड बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता आहे. या समितीचे सभापती संभाजी पाटील पुणेगांवकर यांनी अशोक चव्हाण यांचे नेतृत्व झुगारत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. खासदार चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आपल्या समर्थकासह त्यांनी भाजपात प्रवेश केला. समर्थकांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे पुष्पहार घालून चिखलीकर यांनी स्वागत केले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांनी संभाजी पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांना भाजपात प्रवेश दिला असल्याची घोषणा केली. सभापती पुणेगावकर यांच्यासह संचालक राम पाटील कदम, संचालक नागोराव पुंडलिकराव पाटील, पुणेगावचे उपसरपंच दादाराव पाटील, विजय कदम, राजेश कदम, बळवंत कदम, रामा खाडे, सुगंध कदम, दादाराव कदम, राजेश्वर कदम, माधव कदम आदींनी चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मराज देशमुख, बालाजीराव पाटील पुणेगावकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप कंदकुर्ते, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष शिरसागर आदींची उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.