Mumbai News : मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली. ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात बैठक झाली. या तीनही नेत्यांच्या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मराठवाड्यातील तीन दिग्गज नेते एकत्र आल्याने आगामी काळात मराठवाड्यातील मोठ्या राजकीय भूकंपाचे हे संकेत तर नाही ना अशी चर्चाही रंगली.
महायुती सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे त्यांच्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत असतात.बुधवारी त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर, कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांची बैठक झाली.
एकीकडे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत असतानाच या बैठकीचे फोटो समोर आल्याने तर्कवितर्कांचे वारे वाहू लागले.या बैठकीची चर्चा थांबत नाही तोच आता मंत्री सत्तारांनी महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्र्यांचं नावही सांगून टाकलं आहे.
महाविकास आघाडीसह महायुतीतही मुख्यमंत्रीपदावरुन दावे-प्रतिदावे सुरू आहेत.महायुतीत भाजपकडून देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार तर शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नावं सध्या मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आहे.तीनही पक्षांच्या नेत्यांकडून आप आपल्या नेत्यांच्यांसाठी जोरदार बॅटिंग केली जाते.
पण एकीकडे मुख्यमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच,विधानसभा निवडणुकांनाही अजून काही महिन्यांचा अवकाश बाकी आहे.मात्र, सत्तारांनी त्याआधीच थेट महाराष्ट्राचे पुढचे 'सीएम' हे एकनाथ शिंदेंच राहणार असल्याचे जाहीरही करुन टाकले.
शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार म्हणाले,आष्टीकर माझ्याकडे कामानिमित्त आले मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे.आणि मग बांगरही त्याचवेळी आले. ही राजकारणाची भेट नव्हती. राजकीय भेट कधीही खुली करता येत नाही, ती बंद दरवाजा आड करतात असा टोलाही त्यांनी लगावला.
याचवेळी आज जे मुख्यमंत्री आहेत, तेच पुढील काळात महाराष्ट्रात सत्तेत येणाऱ्या सरकारचेही तेच मुख्यमंत्री राहतील.आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकनाथ शिंदे हे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली येणारी निवडणूक आम्ही निश्चित जिंकू आणि पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होणार हा माझा आत्मविश्वास असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मुस्लिम महिलांना मिळू नये असं वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावर सत्तार म्हणाले, प्रकाश महाजन काय बोलतात ते महत्त्वाचं नाही. वक्फ बोर्ड सरकारचा एक भाग आहे.यात दाढी बघण हे चुकीचे आहेन जात धर्म सोडून बघायला पाहिजे.मग आता मुसलमानाचा जीएसटी वेगळा करावा लागेल, हिंदूंचा जीएसटी वेगळा करावा लागेल. त्यामुळे या राज्यात सर्वांना समान अधिकार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.