Mumbai Political News : विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आलेली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. 'मातोश्री'वरील चौकडी उद्धव ठाकरेंना भेटू देत नाही, असा आरोप काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामाच दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत कलह कोणत्या वळणावर जाणार, याकडे लक्ष आहे.
विधानसभा तोंडावर असताना ठाकरे गटातील नेत्यांनी राजीनामा सत्र सुरू झाल्याने पक्षात वाद असल्याचे स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 'मतोश्री'वरील चौकडी ठाकरेंची भेट होऊ देत नाहीत, असा आरोप पदाधिकारी करत आहेत. यातून कुर्ला विभाग प्रमुख महेश पेडणेकर यांच्यासह सर्व शाखा प्रमुखांना राजीनामा दिला आहे. पालघरचे राजेंद्र पाटील यांनीही राजीनामा दिला.
पक्ष प्रमुखांना माझे म्हणणे पत्राद्वारे कळवले आहे. या पक्षात ३४ वर्षे काम करत आहे. या काळात माझ्या घरावर आणि हॉटेलवर हल्ला झाला तरी मी पक्ष सोडला नाही. असे प्रामाणिकपणे काम केल्याचे बक्षिस त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची भेट न देता दिले आहे. याबाबतची नाराजी आम्ही पक्ष प्रमुखांना कळवली असून आता आम्ही राजीनामा दिलेला आहे, असे पेडणेकरांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटातील आमदारांनीही उद्धव ठाकरे Uddhav Thackeray भेट देत नसल्याचा आरोप केला होता होता. त्यांच्याभोवती असलेले लोक ठाकरेंच्या भेटीत अडथळा निर्माण करत असल्याचेही शिंदे गटाकडून वारंवार सांगितले गेले. आता ऐन विधानसभा निवडणूक तोंडावर असताना कुर्ला आणि पालघरच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे गटाची अडचण वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.