Hingoli News : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर किडनी (यकृत) ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये अपेक्षित सुधारणा होत नव्हती. दोन वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्या ग्रस्त होत्या. अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली.
मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल दुपारी सुषमा पाटील यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या मुळगावी आष्टीवर शोककळा पसरली. (Hingoli) उद्या, गुरुवार (ता.11) रोजी सकाळी 10 वाजता आष्टी (ता. हदगाव) येथे सुषमा पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नागेश पाटील आष्टीकर जेव्हा मतदारसंघाबाहेर असायचे तेव्हा आष्टी (ता. हदगाव) येथील वाड्यावर येणाऱ्या प्रत्येक नागरीकाची सुषमा पाटील या आस्थेवाईकपणे चौकशी करायच्या.
सासरी राजकीय वारसा असल्याने लोकांची कायम वर्दळ असायची. लोकांच्या अडचणी, समस्या ऐकून घेत त्या सोडवण्याचा, आलेल्या प्रत्येकाचे समाधान होईल, असा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. (Marathwada) खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी 2014 ते 2019 या काळात हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्या काळातही सुषमा पाटील या कायम मतदारसंघातील नागरिकांशी संपर्कात असयाच्या.
सुषमा पाटील यांचे माहेर खरूस (बु.)(ता. उमरखेड) हे होते. त्यांच्या निधनाने आष्टीकर व खरुसकर कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत 27 जानेवारी 1991 रोजी खरुस (बु.) ता. उमरखेड येथे सुषमा पाटील यांचा विवाह झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा कृष्णा मुलगी पुजा हे अपत्य आहे. सुषमा पाटील शांत व धार्मिक स्वभावाच्या होत्या. अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. परंतु मागील काळात त्यांच्यावर किडनी (यकृत) ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.